२४८३, अभंग :- स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२४८३
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥
आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥
इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥
तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाठी ॥३॥

अर्थ

स्तुती किंवा निंदा करायची असेल तर देवाचीच करा व त्याच्याच ठिकाणी एकनिष्ठ रहा सामान्य माणसाची निंदा व स्तुती जो करतो तो अधम असतो व त्याची वाणी तो व्यर्थ खर्च करत असतो.काही लोक पारमार्थिक बोल ऐकून देखील न ऐकल्यासारखे करतात त्यावेळी ते जणू बहिरे च होतात आणि इतरांची निंदा करून ते नरकाला जातात.निंदा केल्यामुळे इहलोकी लोक त्याच्या तोंडावर थुंकतात आणि मेल्यानंतर त्याला अघोर असा नरकवास भोगावा लागतो.तुकाराम महाराज म्हणतात अहो ज्या वाणीने हरीनाम घ्यावे त्याच वाणीने हे लोक इतरांची निंदा करतात आणि नरकवास भोगतात.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading