नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२८१९
नव्हों सभाधीट । समोर बोलायाचे नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥१॥
आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येईल करुणा । तेचि पहा तुम्हांसी ॥ध्रु.॥
ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां वेळ कधीं । कोण्या जन्में निवाड ॥२॥
आतां शेवटीचें । उत्तर तें हेंचि साचें । शरण आलें त्याचें । तुका म्हणे सांभाळा ॥३॥
अर्थ
देवा एकदमच तुमच्यासमोर नीट येऊन बोलणे एवढे आमचे धैर्य नाही एवढे आम्ही सभाधिट नाहीत. परंतू देवा तुम्ही आम्हाला एकटे एकांतात दिसले दुसरे कोणीही तुमच्याजवळ दिसले नाही त्यामुळे मी तुमच्याशी बोलत आहे. हे नारायणा आता तुमचे व माझे काय कर्तव्य आहे हे तुम्हीच ठरवा. आणि तुम्हाला माझ्यावर दया येईल तेच तुम्ही पाहावे करावे. माझ्या बुध्दीला तर ताळाच राहिलेला नाही ती शुध्दीवर जरी धरण्यास गेले तरी ती धरली जात नाही. आता माझ्या सेवेला फळ केव्हा येईल आणि कोणत्या जन्मात तुम्ही माझा उध्दाराचा निवाडा करणार आहात? तुकाराम महाराज म्हणतात, “आता तुम्हाला शेवटचे हेच सांगायचे आहे देवा, मी तुम्हाला शरण आलो आहे तुम्ही माझा सांभाळ करा.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
