नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २०५५
जैसे चित्त जयावरी । तैसे जवळी ते दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडे उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥धृपद॥
अवघे जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया शुद्धी ॥३॥
अर्थ
ज्याची ज्या वस्तूविषयी जशा प्रकारची चित्तात समजूत असते त्याप्रमाणे त्याला ती वस्तू जवळ अथवा दूर होत असते ;म्हणूनच ‘ देव नाही ‘ अशी ज्याची समजूत झाली त्याला देव दूर आहे आणि ‘ देव आहे ‘ अशी समजूत असेल तर तो फार जवळ आहे. ‘ देव ‘ आहे यासंबंधी काही बोलायलाच नको. कारण नुसत्या कोरड्या बोलण्याने काय होणार आहे ? वस्तुस्थितीने पाहिले तर सर्वांच्या हृदयात ‘ मी दृष्टा आहे ‘ या रूपाने जे ज्ञान होते ते देवाचेच ज्ञान होय. त्यामुळे तो अगदी जवळ आहे. सर्वांच्या कर्माची सूत्रे ज्याच्या हातांत आहेत आणि कोणता जीव कसा नाचतो ;अहंकारारूढ होऊन कसे कर्म करतो हे सर्व जो पाहातो त्याला ‘ देव ‘ म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात सारांश जशी ज्याची सदोष वा निर्दोष बुध्दी असेल त्याप्रमाणे त्याला भ्रम – प्रेमात्मक ज्ञान होते.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
