👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४४
सकुमार साखर कापुरें घोळिली । गोडी परिमळ दोन्ही उरली ॥ मित्रत्व करा जीवाहून वेगळे । पढियंते आगळ प्रेमजाण ॥ तरूमाजी जैसा एक चंदनु । राहिल वेधुनी वनस्पती ॥ बापरखुमादेविवरू जीवींचा जिव्हाळा । कांही केलिया वेगळा नव्हे गे माये ॥
अर्थ:-
साखर व कापुरात घोळली तर गोडी बरोबर सुगंध ही प्राप्त होतो.तसेच जीवाची जोडी करण्या पेक्षा शिवाची जोडी केली की प्रेमभाव कळतो. जंगलात एकच चंदनाचे झाड शेजारील सर्व झाडांना सुंगंधीत करते. त्या प्रमाणे मी माझे पिता व रखुमाईचे पती यांचा संग धरला तर ते माझ्या जीवापासुन वेगळेच झाले नाहीत असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.243
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.245
