संत गाडगेबाबा संपुर्ण भाग ८, (३६ ते ३७)

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,............

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………

    हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.

This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.              

!!! संत गाडगेबाबा  !!!      

           

भाग – ३६.

        कुंताबाईला गाडीतून खाली उतरवून म्हणाले,तुम्ही इथेच रहा.माधुकरी मागून….मंडळींनी भजन सुरु केले.गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला।। गाडी निघाली.आतां कदाचित बाबांचे दर्शन घडणार नाही असे वाटून सर्वांचे प्राण कंठाशी आले.घशात हुंदका दाटला.गाडीत मध्यभागी घातलेल्या गादी वर बाबा स्वस्थ बसून होते.भाऊराव काळे सावधपणे गाडी चालवत नागर वाडीच्या रस्त्याने धावत होती.खरवाडी च्या पुढे बाबांना थोडे अस्वस्थ वाटत असल्यामुळे गाडी सावकाश चालवायची सूचना केली.भजनाचा घोष सुरु होता. चांदूरला श्रीधर राऊतांच्या घराजवळ गाडी थांबली.वार्ता कळताच दर्शनार्थ लोक गाडीभोवती जमा झाले.श्रीधर राऊतांना गाडीतील अकरा लोकांसाठी अकरा घरुन भाकरी आणायला सांगीतले.भाकरी आल्यावर राऊतांच्या ओसरीवर पंगत बसली.

        बाबा नागरवाडीस निघाल्याचे कळतांच लोकं चिंतेत पडले.रात्रीची वेळ

कच्चा रस्ता,आडवाटेने बाबांना नेणे कठीणच!प्रतिक्षणी तब्बेत ढासळतच होती.घाईघाईने सरकारी डाॅ.ना बोलावण्यात आले.ऑक्सीजनची निकड सांगीतली,तात्पुरते एक इंजेक्शन दिले. हैदराबादच्या दुर्गय्यास कळतांच स्पेशल टॅक्सीने चांदूरला आले.बाबांनी त्यांना बघून हात जोडले,डोळ्यातून दोन थेंब खाली ओघळले.दिवलीतील तेल संपत आले.बसल्या बसल्या बाबा कलंडू लागले.धास्तावून मंडळींनी बाबांना  अलगद उचलून गाडीतील गादीवर ठेवले. अतिशय वेगाने गाडी परत अमरावतीकडे निघाली.थोडे सावध झाल्यावर बाबांनी खुणेने कुठे जात आहो म्हणून विचारल्या वर अमरावतीस सांगीतल्यावर निरुपाया चा संकेत करुन थकलेल्या बाबांनी असहाय्यपणे डोळे मिटून घेतले.वलगांव मागे टाकून गाडी अमरावतीकडे वळली. पुढे पेठी नदीच्या पुलावर गाडी आली. शिंदे आणि अच्युतराव एकीकडे भजन करीत होते तर,दुसरीकडे व्याकुळ नजरेने  बाबांची मुद्रा न्याहाळीत होते.गाडी पूल ओलांडीत होते तोच बाबांनी डोळे उघडून शेवटची एकवार सर्वांकडे पाहिले आणि मान कलली.ज्योत विझली.बाबां चे प्राण अनंतात विलिन झाले.एक झंझावती वादळ शांत झाले.भाऊराव काळेंनी पूलापलिकडे एका बाजूस गाडी उभी केली.त्यावेळी रात्रीचे १२.२० झाले होते.शेवटी बाबांनी आपलेच खरे केले. दवाखान्यात नव्हे तर नागरवाडीच्या वाटे वर शरीर त्यागले.

        कांंहीतरी चमत्कार घडेल आणि बाबा पुन्हा आपल्याशी बोलतील असा खुळा विचार सगळ्यांच्या मनी येत होता. पण समोर बाबांचे निष्पाण शरीर पडले होते.संपलं सगळच!आणि आतांपर्यंत दाबून ठेवलेला आक्रोश सर्वांच्या मुखा वाटे बाहेर पडला.कांही काळ तर सारेच सुन्न झालेले,मध्यरात्र उलटून गेलेली.त्या भयान रानात काय करावे कुणालाच कळेना.अच्युतरावांनी बाबांच्या गळ्याला हात लावून बघीतला तर थोडे गरम वाटले.शिंदेंना म्हणाले धुगधुगी आहेसे वाटते.डाॅ.कडे नेले तर अजूनही काही होऊ शकेल.भाऊराव ड्रायव्हरने जिवा च्या आकांताने त्या निर्मनुष्य रस्त्यावरुन गाडी पळवीत अमरावतीला डाॅ.शहाच्या घरासमोरच थांबवली.घाईघाईने डाॅ.ना रडवेल्या आर्त आवाजात हाक मारली. ह्रदयविदारक आवाज ऐकुन बाहेर आले. गाडीत चढून बाबांची नाडी नीट तपासली खाली उतरुन रुध्द कंठाने म्हणाले, बाबा आपणां सर्वांना सोडून गेले.

         कांही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग अच्युतरावांच्या नजरे समोर तरळला. अनुयायांकडून धर्मशाळेचे काम करवून घेत असतांना अचानक बाबांना थंडी भरुन आली.त्यांना छपरीत नेऊन अंगा वर घोंगड्या,ब्लॅंकेट,गोदड्या पांघरल्या. पण थंडी राहेना.शरीर थडथडा उडूं लागले.सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. अर्ध्या तासाने थंडी कमी होऊन दरदरुन घाम आला.अंग पुसून भिंतिला टेकून बसले.सर्व अनुयायांना हाक मारुन म्हणाले,वेळ आली होती पण परत गेली. हे नश्वर शरीर कधीतरी पडणारच.त्या वेळी कोणाला बोलावू नका.तारा करु नका.जिथे माझा जीव जाईल तिथेच पडूं द्या.म्युनिसीपाल्टीचे सेवक माझे प्रेत नेऊन दहन करतील.समाधी बांधू नका. दुःखी न होता  आपले काम करीत रहा.

            क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
           २-१०-२०२१.

!!!  संत गाडगेबाबा  !!!

अंतिम भाग -३७.

        अच्युतरावासमोर बाबांनी म्हटल्या प्रमाणे साक्षात तसाच प्रसंग उभा ठाकला.यावेळी काय करावे त्यांना कळेनासे झाले.शिंदेंच्या म्हणण्यानुसार भुसावळ रेल्वेचे दोन फाटे फुटतात,एक पूर्वेकडे,एक उत्तरेकडे हे संगमस्थळ बाबांना आवडले होते तिथेच दहन करावे सर्वांच्यामते गाडी राठोडांच्या बागेत न्यायचे ठरले.सगळीकडे बातमी पसरल्याने एकच हलकल्लोळ माजला होता.डाॅ.आंबेडकरांच्या निर्वाणाच्या तेराव्या दिवसानिमित्य अमरावतीस बौध्दांची प्रचंड सभा भरली होती,तीथे वृत्त कळतांच वेड्यासारखे लोक राठोड बगीच्याकडे धावले.मुंबई,नाशिक, पढरपूर धर्मशाळांना फोन करुन ही दुःखद वार्ता कळविण्यात आले.वृत्तपत्रां ना तारा धाडल्या.चहूकडून शोकाकुल जनतेची रीघ लागली.परगावचे लोक मिळेल त्या वाहनाने अमरावतीकडे धावले.

        इकडे राठोड बागेत अग्निसंस्कार कुठे करावा यावर वाद निर्माण झाला. कुणाचेच एकमत होईना.कुंताबाई व आलोकाबाईचे म्हणने ऋणमोचनला अग्निदाह करावा.शिंदेचा पक्ष भुसावळ चा आग्रह धरुं लागले.राठोड आणि अमरावतीकरांचे म्हणणे वाटेल ते झाले तरी शव इथून हलू देणार नाही.अंतिम संस्कार अमरावतितच व्हावा.भुसावळ वरुन तुकडोजी महाराजांची तार आली माझे अंत्यदर्शन झाल्याशिवाय अग्नि संस्कार करुं नये.अच्युतराव दादा एका बाजूस कांही न बोलतां बसून राहिले. राठोडांनी बगीच्याचे दरवाजे बंद केले. शेवटी अमरावतीतच अन्त्यसंस्कार करण्याचे ठरले.इथे मात्र अच्युतरावांनी आग्रह धरला,जिथे दहन होईल ती जागा कोणाच्याही मालकीची नसावी.राठोडांनी एक एकर जागा समाधीच्या नावाने केली

          बाबांच्या निधनाची वार्ता पहाटेस शहरभर पसरली.दर्शनासाठी स्री पुरुषां ची गर्दी दाटली.अश्रूपूर्ण नयनाने दर्शन घेऊन प्रत्येकजण परतत होता.भारताचे कृषिमंत्री डाॅ.पंजाबराव देशमुख आणि मुंबइराज्याचे सर्वोदय उपमंत्री श्री बांद्रेकरांचा मुक्काम अमरावतीतच असल्यामुळे दोघांनी येऊन श्रध्दांजली वाहिली.झुणकाभाकर सत्यनारायण मंडळाचे श्री.अनंत हरि गद्रे,मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण,मंत्री श्री.नाईक निंबाळकर,तपासे,कर्मवीर भाऊंराव पाटील,आचार्य अत्रे या प्रभुतींनी पुष्पहार घालून श्रध्दांजली अर्पण केली.शहरांंत कडकडीत हरताळ पाळण्यांत आला. कोर्टकचेर्‍या,शाळा काॅलेज यांनाही सुटी देण्यात आली.

           आसनस्थ स्थितीत बाबांचा पार्थिव देह मोटारीवर ठेवण्यात आला. बाजूस कुंताबाई व निकटवर्तीय बसले. दुपारी एक वाजतां राठोड बगीच्यातून बाबांची वैकुंठयात्रा श्रृंगारलेल्या मोटारीतून गोपाळा गोपाळा।देवकी नंदन गोपाला या बाबांच्या आवडीच्या घोषात, भजनी दिंडीत हजारों स्री पुषुस सामील होऊन,समोर ह.व्या.प्र.मंडळाच्या बॅंडसह भव्य मिरवणूक निघाली.ठीकठीकाणी पुष्पहार घालण्यांत येत होते.गोपाला गोपाला।देवकी नंदन गोपालचा जयघोष, भजनी दिंड्या,अफाट जनसागर यामुळे अंबापूरीला पंढरीचे रुप प्राप्त झाले होते.

मोर्शी रोड,राजकमल चौक,स्टेशनमार्गे  भव्य मिरवणूक परत राठोड बगीच्यात पोहोचण्यास तब्बल नऊ तास लागले. अमरावतीच्या इतिहासात अन्त्ययात्रेची एवढी प्रचंड मिरवणूक प्रथमच निघाली असेल.

        शवयात्रा राठोड बगीच्यात पोहचली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.चंदन, अत्तर,तुपाचे डबे इत्यादी दहनाचे साहित्य व अफाट जनसमुदाय जमला होता.वाट होती फक्त तुकडोजी महाराजां ची!शेवटी रात्री १२॥ वाजतां ते पोहोचले पुन्हा भावनांचा सागर उचंबवून आला.  तुकडोजी महाराजांनी बाबांच्या कलेवरा चे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहली तेव्हा सर्वांना आपले आसवे आवरेनासे झाले.

        चंदनाची चित्ता रचण्यात आली. नाना सुगंधी द्रव्ये ठेवण्यात आली.बाबां च्या अंगावर जी वस्रे होती,त्यासह त्यांचे शव चित्तेवर ठेवण्यात आले.वर हारांचा ढीग!बाबांची सगुण मूर्ती दृष्टीआड होताच पुनः शोकसागर अनावर झाला.

       रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी बाबांचे नातू वासूदेवराव सोनावणेंनी बाबांच्या चित्तेला अग्नि दिला.धडाधड लाकडे पेटली.गोपाला गोपाला।देवकी नंदन गोपालाची धून सुरु होती. अग्नि नारायणाने या महान महापुरुषाचा देह भस्मीभूत केला.जनसागर परतला,पण बाबांचे अनुयायी तिथेच बसून राहिले.

       दुसर्‍या दिवशी राख सावडून रक्षेचे अस्थिकलश एका खोलीत ठेवण्यात आले.तेराव्या दिवशी अस्थिकलश तापी नदीमधे विसर्जित करण्यात आले.

        जन्मभर ज्या महापुरुषाने जनता जनार्दनासाठी शरीर झिजवले,त्यांची रक्षा तापीपात्रामधे विसावून सागरात मिळाली.खांडवा आणि नागपूर या दोन रेल्वे लाईनच्या मध्यभागी असलेल्या तापीतीरावर श्रीगाडगेबाबा शांतीधाम संस्था आहे.तेथील तळघरांत बाबांचा अस्थिकलश ठेवण्यांत आला आहे.

         अशा या महान विभूतीस कोटी कोटी प्रणाम!!

                 !!  समाप्त !!
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.
            दि.  ३-१०-२०२१.

संत गाडगेबाबा संपूर्ण भाग

सर्व पौराणिक चरित्रे

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading