भागः-4 पितामह भीष्माचार्यः संपूर्ण चरित्र (कादंबरीरुपात)

पांडवांचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपला. संजयची आणि श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली. शेवटी उघड उघड युध्दाचा निर्णय कायम झाला. भीष्मांना महायुध्दाचा निर्णय घ्यावा लागला. सामुहिक नाश ! परधर्मासाठी तत्कालीक हिंसा करावीच लागते. *अहिंसा परमो धर्मः* हा व्यक्तीच्या

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

पितामह भीष्माचार्यः ही चरित्र लेखमाला मीनाक्षी देशमुख संकलित संपूर्ण चरित्र अर्थात (कादंबरीरुपात) या लेखमालेचे एकूण २५ भाग असून येथे वाचण्यासाठी सोपे व्हावे म्हणून मूळच्या ५ भागाचा १ भाग बनविला आहे. याची नोंद घ्यावी.
Part:-1 Pitamah Bhishmacharya: Complete Biography (Novel Form), Pitamah Bhishma Complete Biography

पितामह भीष्म संपूर्ण चरित्र

भीष्म पितामह

भाग-१६

पांडवांचा बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास संपला. संजयची आणि श्रीकृष्णाची शिष्टाई वाया गेली. शेवटी उघड उघड युध्दाचा निर्णय कायम झाला. भीष्मांना महायुध्दाचा निर्णय घ्यावा लागला. सामुहिक नाश ! परधर्मासाठी तत्कालीक हिंसा करावीच लागते. *अहिंसा परमो धर्मः* हा व्यक्तीच्या विकासाचा धर्म आहे, समष्टीचा नव्हे ! भीष्म हस्तीनापुर राज्याशी बांधील असल्यामुळे धृतराष्टाच्या बाजुने असणे भाग होते, कारण प्रचलीत धर्माचे पालन करणारे म्हणुन प्रसिध्द होते.

भीष्मांना मृत्यु आणि पराजय स्पर्श करुं शकत नसल्यामुळे पांडवांना जिंकण्यासाठी कृष्णाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. भीष्मांना कर्महेतु पहावा लागेल. श्रेष्ठहेतु आणि श्रेष्ठकर्मच विजय देऊं शकतात.

पांडव म्हणजे धर्म नव्हे ! त्यांना धर्म प्रिय आहे. विश्वधर्मासाठी नारायण पांडवांचा साधन म्हणुन उपयोग करीत आहे. एक व्यक्ती म्हणुन भीष्म सदैव स्मरणात राहिलही, पण सर्वांच्या मरणांतच विश्वधर्माचं बीज आहे. श्रीकृष्ण पांडवांना मरुं देणार नाहीत म्हणुनच ते विजयी ठरतील. कमालीच्या विश्वासानं नियमांच आणि शब्दांचं पालन भीष्मांशिवाय कोणीही करुं शकणार नाही. युध्दापुर्वी नियम ठरविण्यात येतील.

मैत्रेय ऋषींनी श्रीकृष्णाची स्तुती करत धृतराष्टाला म्हणाले, “तू कुरुंच पीठ सांभाळत आहेस ! भीष्मांसारखे लोक मनिषी असतांना पांडवांचा विरोध, निग्रह आणि अनुग्रहाने तुझ्या मुलांना आवरु शकतोस. भीमाने भयंकर किर्मिर, बकासुर राक्षसांना समाप्त केले त्या पांडवांचा तुझे पुत्र सामना करु शकेल ?”

दुर्योधनाने उपेक्षेने त्यांचेकडे पाहिल्यामुळे त्यांनी कमंडलुमधील अभिमंत्रीत जलाचे त्याचेवर शिंपन करुन कडाडले, “तुझ्या या द्वेषाने महायुध्द होईल, भीम तुझी मांडी फोडेल.”

असे म्हणुन ते भीष्मांच्या कक्षेत गेले. तीथे व्यास, भीष्म, मैत्र्येयांची चर्चा रंगली. ज्याची बुध्दी दुग्धक्षीर न्याय करुं शकते, ज्यांचा संपुर्ण वेद मुखोदगत आहे, सर्व शास्र ज्यांचे स्मरणांत आहे, जो सर्व विद्या, आधार घेतल्याशिवाय शिकवु शकतो आणि ज्याचे सर्व कलागुण ताजे आहेत असे भीष्म जीथे आहे तीथे नितिमत्ता, सदाचरण, धर्म हे असणारच ! युध्द हे संस्कृतीचे दुःखी चित्र आहे.

विराटनगरीतील सेनापती किचकाचा वध भीमाशिवाय कोणी करु शकत नाही हे निश्चित झाल्यामुळे भीष्मांसह कुरुंनी विराट नगरावर हल्ला चढवला, भयंकर युध्द झाले, पांडवांनी एकाही धार्तराष्टाला मारले नाही, पण भीष्मांसह सर्वांना जखमी मात्र केले.

जखमी भीष्मांना भेटायला त्यांचे कक्षेत गेले असतां भीष्मांनी त्यांचे समोर युध्दाचे भिषण चित्र उभे केले व युध्द थांबवण्याबद्दल सांगीतले, पांडवांना अर्धे राज्य देऊन समेट घडविण्याचे सुचवले. पण धृतराष्टाच भाग्यच पाठमोरं होतय, तीथे सुबुध्दी कुठुन सुचणार ?

भीष्मांच शरीर तापुन लालीलाल झाले. ब्रम्हा, विष्णु, महेशांची अस्रे त्यांच्यात प्रविष्ट झाल्याची जाणीव झाल्याने त्यांनी जल हाती घेऊन म्हणाले, “हे संचालका, संहारक देवा ! विश्वशांतीच्या प्रयोगात अंत न पाहता माझी आहुती, गुरुंनी दिलेल्या गुणवैभवाचं हवनांत स्विकृत करावं.”

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-१७

युधीष्ठीरांना युध्द टाळायचे असल्याने अविस्थल, वृकस्थल, माकंदी, वारणावत आणि पांचवं जे देतील ते अश्या पांच गावांची मागणी केली. पण दुर्योधनाने सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जागा देण्याचे नाकारले. निर्धनता म्हणजे मृत्यु ! द्रव्यहिनताला नातीबांधव आणि स्नेही सुध्दा सोडुन जातात! यापेक्षा क्लेशदायक अवस्था ती कोणती ? धन म्हणजेच श्रेष्ठ धर्म! असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

धर्म प्राप्त करण्याच्या कर्मानं धार्तराष्टांना मारुन मिळवलेले धन नकोय ! क्षात्रधर्मच मुर्तिमंत पाप आहे. क्षत्रीयच दुसर्‍यांना मारुन वित्त कमावतो. सर्वांना मारुन मिळालेला विजयाचा काय आनंद ? म्हणुन युध्द नको असे कृष्णाला युधीष्ठीर परोपरीने सांगत होते. कृष्ण त्यांना म्हणाला, गेली दोन शतकं योजना सुरु आहे. भीष्मांचा जन्म त्यासाठीच झाला. श्रीरामाच्यापुर्वी मांडव्य ऋषींनी यमदेंना दिलेल्या शापामुळे विदुरांचा जन्म झाला. दुर्वासांची तपश्चर्या तेवढीच पुरातन आहे. आम्ही नर नारायण अनादु आहोत. पार्थ नर आहे तर कर्ण या यंत्रणेचा एक भाग आहे. कुठलही ममत्व न ठेवतां आपापलं कर्म करावं !

युध्द आतां निश्चित होणारं ! युध्द करणं स्वकर्म आहे, न केल्यास अधर्म होईल भीष्मांनी शंभुकरणलाळ युध्दभुमीत सतत सोबत राहण्याची आज्ञा केली. त्याला प्रतिकारात्मक अस्र आणि कवच दिल्यामुळे महायुध्दात निर्भयतेने फीरु शकेल. कृष्ण-कर्णाची आणि कुंती-कर्णाची भेट झाल्याचे कळल्यावर भीष्म स्तब्ध झाले.

युध्दावर जाण्यापुर्वी भीष्मांनी शंभुकरच्या वंशजासाठी त्याला कळु न देता अमाप धन पाठवले. त्यांनी सर्व चीजवस्तु वाटुन टाकल्या. कक्षातील भिंतीवर फक्त श्रीगुरु परशुरामांची मुर्ति व तेवणारा दीप सोडुन कांहीच शिल्लक नव्हतं.


युध्दभूमीवर जातांना इच्छामरणु भीष्मांनी अश्रू ढाळले आणि आसक्तीचं रसायण वाहु दिलं. थोड्या वेळाने दुर्योधन सर्व राजांसह भीष्मांच्या दर्शनाला आले. भीष्म कुरुक्षेत्राचं रेखाचित्र काढुन दिशा, वायुची दिशा, सुर्योदयाचे-सुर्यास्ताची वेव, तपमान, वर्षा होण्याची संभावना, रणक्षेत्रावर कोणता व्युह कुठे, कसा योग्य होईल याची टिपणं काढीत होते.

दुर्योधनाने त्यांची स्तुती केल्यावर ते म्हणाले, “पांडव आणि धार्तराष्ट दोन्हीही सारखेच. या पृथ्वीतलावर भीष्मासारखा अस्रज्ञ फक्त अर्जुन आहे, त्यामुळे जीथे मी असेल तीथे तो व्रतेने अस्र, शस्र टाकणार नाही” हे ऐकुन सर्वजण तनावमुक्त झाले.

भीष्मांनी दोन अटींवर सेनापतीपद स्विकारले. पहिलं म्हणजे पांडुपुत्र, पौत्रांना वधणार नाही पण माझ्या तडाख्यानी त्यांची फळी फुटेल! दुसरं म्हणजे मी सेनापती असेपर्यत कर्ण सेनेत नसेल ! भीष्मांच्या बोलण्याने दिग्मुढ झालेल्या दुर्योधनाची सुटका कर्णाने केली. पितामह थोर योध्दा आहेत. त्यांच्यानंतर पांडवांचा पडाव मी करीन. दुर्योधनाच्या भात्यात अकरा अक्षौणी शर ,भीष्म द्रोणादु महाअस्र आणि राखीव दिव्यास्र कर्ण आहेत.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-१८

युध्दाच्या आदल्या रात्री दोन्ही पक्षातील बलाबलाची चर्चा केली. ज्यांनी सव्वाशे वर्षापुर्वी धनुष्याची प्रत्यंचा सोडली त्या भीष्मांनी प्रत्येक योध्याचं बारकाईने केलेले वर्णन आणि लढाईतील केलेली प्रतवारी ऐकुन सर्व थक्क झाले. त्यांनी सांगीतले प्रत्येक दिवशी दशसहस्र योध्दे मारीन पण समोर शिखंडी आल्यास त्याच्याशी यध्द करणार नाही. ती पुर्वजन्मीची अंबा आहे.

भीष्म आपल्या शिबिरात एकटे पहुडले असता त्यांना एका स्रीचे भयानक आवाजातील खदखदने कानावर आले. ते खदखदण्यातच एवढी भयानकता होती की, शरीराला कंप सुटुन कंठ शुष्क झाल्याचा भास झाला. ओळखीचा आवाज ऐकु आला. तो आवाज अंबाचा होता. ती आपल्या वेदना ऐकवत म्हणाली, “त्यावेळी शाल्व, भीष्म, मुनीवर, प्रत्यक्ष परशुराम या सर्वांनी मला हे सर्व विसरायला सांगीतले, पण अंतःकरणातील आग, सत्तास्पर्धेत जळालेल्या नाजुक भावना, हळव्या मनाची झालेली कुतरओढ, ह्रदयावर झालेला घाव, त्यातुन निघालेल्या वेदना कुणीच समजुन घेतल्या नाहीत. अंबा जळली, जळत राहिली, कालौघात अंबेचं जळण लोक विसरुन गेलेत पण त्यांचा हा गैरसमज होता.”

“भीष्माचार्य, कुरुनंदना, आपण आजन्म ब्रम्हचर्य व्रताची प्रतिज्ञा केल्यामुळे स्रीसहवास लाभला नाही परंतु मातेचं प्रेम थोड कां होईना अनुभवलं. पतीसाठी डोळ्यावर पट्टी बांधुन वावरणारी गांधारी, पांडुपुत्रांना जन्म देण्यासाठी मरणयातना सोसणारी कुंती यांच्या वर्तणुकीतुन अतुलनीय प्रेमाच्या अविष्काराचा साक्षात्कार झाला असेलच. स्रीला त्यागाची आणि प्रेमाची मुर्तीचे रुप मानतात, पण तीचे आणखीही एक रुप असते, चवताळलेल्या वाघीणीचे, दुखावलेली स्री डिवचलेल्या नागीणीपेक्षा, एवढंच काय चवताळलेल्या वाघीणीपेक्षा भयंकर असते.”

“राजन ! आपण स्वयंवर मंडपांत बळाच्या जोरावर हरणं केलं नसतं तर आशा, आकांशा, इच्छासहित शाल्वासारख्या पुरुषाची भार्या म्हणुन वैभवाच्या शिखरावर असती. पण मेरुमंदारासारखा आधार दुष्टपणे हिरावुन इच्छा अपेक्षांना धक्का दिला, एक पतीता बनवुन अनाथ, निराधार करुन जननिंदेचा विषय बनविले. पतीगृह, पितागृहास मुकल्यामुळे अनाथासारखे तब्बल बारा वर्षे वणवण भटकावे लागले.”

“प्रतिशोध घेण्यासाठी सहा सहा मास अन्नाशिवाय खडतर तपश्चर्या केली. मास नी मास एका पायावर उभी राहिली.”

भीष्म म्हणाले, “प्रतिशोधच घ्यायचा होता तर एवढे कष्ट कशाला घेतले ? स्वतःची तलवार देऊन समोर उभा राहिलो असतो, वृथा जीवन मातीमोल करुन कांही साध्य होत नाही असे पाहुन स्वतःला जाळुन जीवनाचा केविलवाणा अंत करुन घेतलास !”

पुढे ते म्हणाले, “इच्छामरणी असल्यामुळे प्राणत्यागाचा संकल्प केल्याशिवाय मृत्यु येऊं शकत नाही.”

त्यावर अंबा म्हणाली, “मी जशी क्षणक्षण जळली, अनाथ पोरकी होऊन भटकली, तशी असाहाय्य अगतीक स्थीती पहायचा क्षण आला आहे. आपली केविलवाणी धडपड पाहणार आहे.” एक भयानक स्वप्न पाहिल्याची जाणीव भीष्मांना झाली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-१९

अंबा भीष्मावर संतापुन निघुन गेली. डिवचलेली नागीण, चवताळलेली वाघीण सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तीचा सूड घेण्याचा मार्ग वेगळाच असणार ! स्रीवर हत्यार उचलायचे नाही अशी प्रतिज्ञा असल्यामुळे युध्दात समोर आली तरी प्रतिकार करु शकणार नव्हते.

अंबेने भीष्मांच्या वधार्थ तिर्थयात्रा सुरु केली. सुडचिंतन करीत नंदाश्रम, उलुकाश्रम, च्यवनाश्रम, ब्रम्हदेवाचे स्थान, प्रयाग, कुरुक्षेत्र, देवांची अरण्ये, भोगवती, कौशिकाश्रम, मांडव्य ऋषींचा आश्रम, दिलीपाश्रमांना भेटी दिल्या. तिच्या खडतर साधना व तपश्चर्येवर प्रसन्न होऊन उमापती शंकरांनी वर दिला की, भीष्माचा वध अंबेकडुन होण्यासाठी पुरुष म्हणुन जन्माला येऊन पुर्वजन्मीच्या स्मृती जागृत असतील. त्याच क्षणी पुर्नजन्मासाठी ऊत्सुक अंबेने जाळुन घेतले.

इकडे पांचालपती दृपदाने खडतर तपश्चर्या करुन शंकराला प्रसन्न करुन भीष्मवधासाठी पुत्राचा वर मागीतला, त्यानुसार अंबेने त्यांच्या घरी शिखंडीने जन्म घेतला. वास्तविक शंकराच्या वराप्रमाणे तीने पुरुष म्हणुन जन्माला यायचे होते पण स्री म्हणुन जन्म झाला. हे सत्य तीच्या आई वडीलांनी जगापासुन लपविले होते. ती वयात आल्यावर तीच्या लग्नासाठी दशार्णदेशाधिपती हिरण्यवर्मा यांची सुस्वरुप सुशील सुंदर सद्वर्तनी मुलगी पसंत केली. ती वडीलांना म्हणाली, “एका मुलीचे दुसर्‍या मुलीशी लग्न कसं होऊ शकेल ?” त्यावर दृपद म्हणाले भीष्माचार्यावर आमचा राग होता, पण त्यांच्या सदाचरणानी सद्वर्तणी प्रखर तेजस्वी व्यक्तीमत्वासमोर त्यांच्याशी दोन हात करुन निस्तेज बनविण्याचं बळ नव्हतं. त्यांच श्रेष्ठत्व बोचत होतं. नाइलाजाने कठोर तपस्या करुन श्रीशंकराला शरण जाऊन भीष्मांचा पराभव करु शकणारा पुत्र मागीतला.

पण कन्याच जन्माला आली, शंकरानी अभय दिले की, आज जरी कन्या असली तरी यथावकाश लग्नानंतर पुत्रात परिवर्तन होईल म्हणुन विवाहाचा घाट घातला. विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. पण तीला सर्व तुच्छ वाटत होतं. तीचं एकच

ध्येय होत, पृथ्वीतलावरील एका नरवीराला नामोहरण, भीष्माचार्यांना नष्ट करायचय !

परंतु ध्येय दुरच राहिल आणि नवीन समस्या समोर आली. प्रत्यक्ष पत्नी बनुन आलेल्या स्रीनेच शिखंडी पुरुष नसल्याचा आकांडतांडव करुन सर्व दोष माथी मारुन, कोवळ्या वयाचा सर्वनाश केला असा दोषारोपण करुन दुखावलेल्या नागीणीगत फुत्कारतच पितृगृही निघुन गेली आणि भीष्माचार्या ऐवजी संतापलेले, दुखावलेले भयंकर हिंस्र स्वरुपातील श्वसुर हिरण्यवर्मा समोर उभू राहिलेत.

असे अपमानकारक जीवन व्यतीत करण्यापेक्षा जीवनात काही अर्थ उरलेला नाही ही जाणीव होऊन एके दिवशी कोणालाही न सांगतां राजप्रसाद, मातापिता, वैभव सारं सोडुन अरण्याचा रस्ता धरला. वनामधे ध्यानीमनी नसतांना स्थूणापर्ण नावाचा यक्ष भेटल्यावर त्याला आपली दुर्दैवी कथा ऐकवली.

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

भीष्म

भाग-२०

थोर मनाच्या स्थूणापर्णाने शिखंडीवरील संकट टळेपर्यंत स्वतःचं पुरुषत्व प्रसंग निभवल्यावर परत करण्याचे बोलीवर बहाल केलं. शिखंडी एक नवी आशा उराशी कवटाळुन पांचाल नगरीत परतला. हिरण्यवर्माना तो पुरुष असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी क्षमा केली व पांचालनगरीवरचं संकट टळलं.

दिलेला शब्द पाळण्यासाठी घेतलेलं पुरुषत्व परत करण्यासाठी शिखंडी पुनः स्थूणापर्णांकडे गेला. परंतु त्याची काळवंडलेली मुद्रा, म्लान वदन, निस्तेज नेत्र, पाहुन कारण विचारले असतां त्यानी सांगीतले की, दिलेलं दातृत्वच शाप बनला. कुबेराने या अपराधाला शासन म्हणुन हयातभर स्रीत्व नशीबी आलं. कुबेराच्या शापामुळे तुला दिलेलं पुरुषत्व परत घेता येत नाही. ते कायमसाठी तुझ्याकडेच राहिल.

शिखंडी जड अंतःकरणाने परतला. पुरुष बनल्यामुळे नाजुकता जाऊन सौष्ठव्यपुर्ण शरीर बनलं. वेदाभ्यास, शस्रास्र विद्या प्राप्त करण्यासाठी हस्तीनापुरला द्रोणाचार्यांच्या आश्रमांत वास्तव्य केलं. धनुर्विद्या, गदायुध्द, तोमर युध्दात प्राविण्य संपादन केलं. ध्येय एकच समोर होतं भीष्मसंहार !

मार्गशीर्ष महिन्यातील शुध्द पक्षाला दोन्ही पक्षातील सेना समोरासमोर उभे राहिले. भीष्म सज्ज होऊन जीवन संपवण्यापुर्वी निर्गुन निराकाफ तेजस्वीतेला धर्माच्या भात्यात ठेवुन इतका रणदंगा करावा की, देवानं जप करावा.

कौरवसेनेसमोर अर्जुनाने रथ आणला. स्तोत्रपठण आणि कालीमातेच्या दर्शनाने अर्जुनातला साधक कार्यरत झाला. त्याने कृष्णाला उभयसेनेच्या मधे रथ घ्यायला सांगीतला. सैन्यात सर्वातपुढे असलेल्या भीष्मांना अर्जुन आणि कृष्णामधे कांही तरी वाद सुरु असल्याचे जाणवलं. त्यांच्या लक्षात आले की, श्रीकृष्ण अर्जुनाला निश्चितच बोधामृत देत असावा. एवढ्यात युधीष्ठीर युध्दावर जाण्यापुर्वी आज्ञा व आशिर्वाद मागण्यासाठी भीष्माजवळ आला. नंतर भीष्मांच्या शंखातुन दिग्विजयी नाद घुमला आणि दोन्ही सेना एकमेकांवर आदळल्या. तुंबळ लढाई सुरु झाली. भीष्मरथ पांडवसेनेत मुसंडी मारत हाःहाकार करु लागले. ते फारच त्वेषाने पांडवसेनेचा नाश करु लागले. अभिमन्यु भीष्मांना आडवा येऊन दुर्मुख, कृतवर्मा, कृप, शल्य आणि भीष्मांना जखमी केले. या युध्दात विराटपुत्र उत्तर आणि श्र्वेत कामी आले.

दुसर्‍या दिवशी भीष्मांनी पांडवाचा क्रौंचारुणव्यूह फोडला. पांडवसेनेची दाणादाण सुरु झाली तेव्हा अर्जुनाने भीष्मासमोर रथ आणुन त्यांच्या भोवतीचं कवच लिलया फोडत होता. भीमसेनाने भीष्मांवर कडव आक्रमण केलं. सात्यकीं त्यांचा सारथी मारला. अभिमन्युला दुर्योधनासह अनेक योध्यानी घेरलं. त्वेषानं अर्जुनाने कौरव सेनेचा धुव्वा उडवायला सुरुवात केली. हे पाहुन भीष्मांनी युध्द समाप्तीचा शंख फुंकला.

कृष्णाने अर्जुनाला म्हटले “तस्मादुतिष्ठ कौन्तेय युध्दाय कृतमिश्रणः” त्यावर अर्जुन उत्तरला “करिष्षे वचनं तव !” हे ऐकुण स्तब्ध झालेले भीष्म म्हणाले धन्य धन्य अर्जुनाची भक्ती !

क्रमशः

संकलन – मिनाक्षी देशमुख.

सूर्यवंशी शूरवीर चरित्र

पितामह भीष्म चरित्र सर्व भाग


✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading