२८८०, अभंग :- अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८८०
अनुभव तो नाहीं तुमच्या दर्शनी । अइकिलें कानें वदे वाणी ।
जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । म्हणतां मांडे पुरी काय होतें ॥१॥
नाही नाही गेली तळमळ दातारा । कां जी हरीहरा चाळविलें ॥ध्रु.॥
पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येईल मानूं ।
अंतरीं सबाह्यी कां नाहीं पारिखें । करूनि पारिखें वर्ततसां ॥२॥
आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडत्यास काय द्यावें ।
तुका म्हणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुम्ही कोठें ॥३॥

अर्थ

देवा मी तुमचे दर्शन प्रत्यक्ष घेतले नाही तुमचा अनुभवही घेतला नाही परंतू संतांच्या मुखाने जे कानाने ऐकले तेच मी लोकांना सांगत आहे. देवा जर जेवणच केले नाही तर त्या जेवणाच्या गोडीचा अनुभव अंतरंगात कसा येईल मांडे पुरी केवळ नुसते असे म्हटले तर काय होणार आहे ? हे दातारा तुमच्या अनुभवाची तुमच्या दर्शनाची तळमळ अजूनही माझ्या अंतकरणातून गेलेली नाही हरीहरा तुम्ही मला का फसविले आहे ? आपल्या मित्रांना किंवा आप्टेष्टांना कोणालाही पत्रामध्ये चांगली कुशलता दाखवायची आणि चांगले पत्रामध्ये बोलायचे परंतू प्रत्यक्षात भेट झाली तर त्याचा अनादर करायचा आपले असे बोलणे कोणाला मान्य होईल काय ? देवा तुम्ही अंतरंगात आणि बाह्यरंगात दोन्हीकडे सारखे का वागत नाही मला परके करुन माझ्याशी परकेपणाने का वागता ? एखादया पाण्यात बुडणाऱ्याला आलो आलो मी तुला वाचवतो तुझी मदत करतो अशी अपेक्षा दाखवायची परंतू करायचे मात्र काहीच नाही अशा वागण्याला काही अर्थ आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात, “अहो चतुरांच्या शिरोमणी माझी वाणी कोठे आणि तुम्ही कोठे माझी वाणी ती केवढी आहे तरीही मी तुमच्याशी कोडकौतुक आणि बोलत आहे ?”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading