२८१८, अभंग :- कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र.२८१८
कां हो वाढवितां देवा । मज घरी समजावा । केवढा हो गोवा । फार केलें थोड्याचें ॥१॥
ठेविन पायांवरी डोईं । यासी तुमचें वेचे काईं । झालों उतराईं । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥
निवाड आपणियांपाशीं । असोनकां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥२॥
तुका म्हणे गोड । होतें झालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडीच वाढेल ॥३॥

अर्थ

देवा आपल्या दोघांमध्ये कोण लबाड आहे याचा चारचौघांमध्ये निवाडा करायचा एवढे वाढवण्यापेक्षा मला घरच्या घरीच समजवा. अहो देवा गोष्ट किती थोडी होती परंतू तुम्ही त्याला फारच मोठी केली. मी माझे मस्तक तुमच्या पायावर ठेवीन मग त्यामध्ये तुमचे काही नुकसान आहे काय ? देवा अहो मी तुमच्या पायावर माझे मस्तक ठेवीन आणि तुम्ही माझ्यावर कृपा करा मग आपण दोघेही एकमेकांच्या ऋणातून मुक्त होऊ सोपी गोष्ट आहे. देवा हे पाहा आपल्या दोघांच्याहीमध्ये जो वाद आहे त्याचा निवाडा देखील आपल्याजवळच आहे मग चारचौघांमध्ये आपला वाद घेऊन आपला अपयश का दाखवायचे. देवा जे काही माझ्या पदरामध्ये माझे म्हणणे होते मी सर्व तुमच्यापाशी ते सोडून मोकळे केले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा आपल्या दोघांच्यामध्ये असणारा वादाचा निवाडा जर घरच्या घरी झाला तरच ते गोड ठरेल. देवा मला तुमच्या दर्शनाची आवड आहे आणि तुम्ही मला जर दर्शन दिले तर मला तुमची आवड अधिकच वाढेल.”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading