
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा या वेबसाईटवर आम्ही पूर्ण प्रकाशित करत आहोत, त्यासाठी त्यांची अनुमती त्यांनी दिलेली आहे, धन्यवाद.
This complete biography is written by Smt. Meenakshitai Deshmukh. We are publishing all his episodes in full on the website 96 Kuli Maratha, with his permission, thanks.
श्री दतात्रय
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – १२.
कार्तवीर्य अर्जुनाने समाधी अस्वस्थेतील केलेल्या आत्मानुभुतीचे विवेचन ऐकुन प्रसन्न झालेल्या दत्तप्रभुं नी त्याची इच्छा विचारल्यावर, वास्तविक ही एक परीक्षाच होती. पण अर्जुनाच्या मनांत खरोखरीच कोणतीच इच्छा उरलेली नव्हती, तो म्हणाला,प्रभो माझ्या चित्तात कोणताच भाव उरलेला नाही. आपल्या आज्ञेनुसार परत गुहेत जाऊन समाधी लावेन, अन्यथा आपले हे मनोहारी रुप न्याहाळत इथेच राहीन. दत्तप्रभुंनी आजचा दिवस गुरुसेवेत घालवण्यास सांगुन, दुसर्या दिवशीपासु न गुहेत जाऊन समाधीस्थ व्हायला सांगीतल्या प्रमाणे दुसर्या दिवशी दत्तप्रभुंना वंदन करुन अर्जुन पुनश्च गुहेत आसनस्थ झाला. मन संमोहित करुन सुषुन्मा मार्गाने प्राण ब्रम्हरघ्रात नेऊन लीन केले. प्रथम तीन,नंतर सहा महिन्यांनी तो भानावर आला. परत समाधी अवस्थेत गेला. एकवर्ष गेले तरी तो देहभानावर आला नाही,म्हणजेच “परतोव्युत्थान” या ज्ञानाच्या सहाव्या भुमिकेत त्याने प्रवेश केल्याने, स्वतः दत्तप्रभुंनी त्याची अवस्था पाहिल्यावर, यापुढच्या भूमिकेत जर गेला तर त्याचा दृष्य जगाचा संबंध पुर्णपणे तुटेल, पण अजुन त्याचे जीवीतकार्य ऊर्वरीत होते म्हणुन प्रभूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवुन समाधी ऊतरवुन त्याला देहभाना वर आणले.
तरीसुध्दा अर्जुनाची इंद्रिये,प्राण, चित्त आताच आत्मस्वरुपाकडे ओढ घेत होते. देहभान सोडणे जेवढे अवघड त्याहुन देहभानावर येणे अवघड आहे. अर्जुन आत्मस्वरुपापासुन परत फिरत नाहीसे पाहून योगीराज प्रभूने आपल्या संकल्पाने त्याचे प्राण इंद्रियासह परत फिरवले. निग्रहानुग्रह समर्थ गुरुच अपल्या शिष्यांचे परमकल्याण करुं शकतात. अर्जुनाचा ब्रम्हरंघ्रात स्थिरावलेला प्राण सुषुन्मेतुन खाली येत प्रत्येक इंद्रियात चेतना परत येऊ लागली.डोळे उघडताच समोर दत्तप्रभुं ची गोजिरी मुर्ती दिसल्यावर त्याची दृष्टी त्या रुपावर स्थिर झाली, ते पाहुन अतिव प्रेमाने प्रभू म्हणाले, आतां खरोखरी तू माझा सेवक बनण्यास योग्य झालास. आतां परत राजधानीत जाऊन निर्लेप, अनासक्त भावनेने कर्तव्य कर!व सतत माझे स्मरण करीत आयुष्य व्यतीत कर! त्यावर तो,म्हणाला,आपले चरण सोडुन कुठेही जाण्याची इच्छा उरलेली नाही. प्रभू म्हणाले, व्दापार युगात अर्जुनाला श्रीकृष्णाने भगवत गीतेत, आत्मज्ञानी पुरुष ज्ञानप्राप्तीनंतर जीवनमुक्ताने कसे वागावे हा उपदेश केलेला आहे.
धर्माची घडी विस्कटु नये, लोक धर्मभ्रष्ट होऊन संहार होऊ नये म्हणुन लोकांना मार्गदर्शन, त्यांना धर्माचरणावर स्थिर करण्यासाठु आणि परोपकारा साठी जीवन्मुक्ताने सनातन धर्मशास्राने घालुन दिलेला आचार करणे, लोकांचा उपद्रव होऊ नये म्हणुन त्यांना बाह्य आचारण शिकवणे भाग आहे.
स्वतः दत्तप्रभु इतर लोकांच्या गर्दी पासुन वाचण्यासाठी बाल, उन्मत किंवा पिशाच्च वृत्तीचा अंगीकार करत अनाधि कार लोकांना दूर ठेवण्यासाठी असे वर्तन करीत असत. अलीकडच्या काळातही अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगांवचे गजानन महाराज, श्री शंकर महाराज ही उदाहरणे आहेत. तू गृहस्थ आहेस. गृहस्थाश्रम व इतर आश्रमांचे पोषण करणारा! तुझा क्षत्रिय वर्ण आणि गृहस्थाश्रम यांना अनुरुप कायिक वाचिक आणि मानसिक अशी त्रिविध कर्मे,मनांत आसक्ती न ठेवतां, बालका प्रमाणे असंग राहून, गुणदोष, बुध्दीचा त्याग करुन निरागस वृत्तीने कर्म करीत रहा. गुरुचरित्रात म्हटल्या प्रमाणे ‘याकारणे अंतःकरणी। दृढता असावी सद्गुरुचरणी। बाह्य रहाटणी। शास्राधारे करावी।।
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – १३.
दत्तप्रभु पुढे म्हणाले, अर्जुना! तूं आपल्षा नगरीत जाऊन मनुष्य,यज्ञ व पित्रृयज्ञ कर! प्रारब्धाच्या प्रवाहात तुझ्या हातुन जे कांही पापपुण्य घडेल त्याचा दोष लागणार नाही, कारण तूं जीवनमुक्त असल्यामुळे तुला विदेह मुक्ती लाभेल. दत्तप्रभुंचे धीर देणारे वचन ऐकुन त्याला भावनांचे ऊमाळे आवरतां आवरेना, देहाचे भानही टीकेना दत्तप्रभुंचे चरण दुरावणार या कल्पनेनेच तो कासाविस झाला.त्याची अवस्था पाहुन प्रभु म्हणाले, माझे सतत चिंतन केल्यास मी तुझ्या सोबतट आहे याचा अनुभव येईल असे अभिवचन देऊन त्यांनी त्याला कवेत घेऊन अत्यंत मायेने निरोप दिला, मनात प्रभुंचे चिंतन करीत अर्जुन महिष्पतीला परतला. महिष्पतीत अर्जुनाचे अभूतपुर्ण स्वागत समारंभ झाल्यावर राजा आपल्या महालात गेला.
श्रीदत्तप्रभुंच्या कृपेने बलाढ्य झाले ल्या अर्जुनाने सप्तद्वीप पृथ्वीचे एकछत्री राज्य केले. “राजा कालस्य कारणम् ” असे शास्र वचन आहे. अर्जुन धर्माची मर्यादा पाळुन राज्य करीत असल्यामुळे राज्यात कोणत्याच प्रकारचे संकट, चोरी,बंडाळी! परकीय आक्रमण, दुष्काळ, अकाली मृत्यु नव्हते. धर्मात्मा अर्जुन इच्छागामीरथात सर्व आयुधे धारण करुन पृथ्वीच्या सातही द्वीपांमधे संचार करीत असे. क्वचित कोणी चोरी किंवा गंभीर अपराध केलाच तर स्वतः त्याला सजा देत असे. दुसर्याच्या मनांतील विचार जाणण्याची कला अवगत असल्यामुळे तो निरपराध्याला कधीच शिक्षा करीत नसे पण दोषी व्यक्तिला तसा सोडीतही नसे. ” अपुज्या यत्र पूज्यन्ते, पूज्यपूजात्यतिक्रमः। तत्र त्रीणिप्रवर्तन्ते दुर्भिक्षं मरणं भयम्।। अर्थातच अर्जुनाच्या राज्यात यांचा मागमुसही नव्हता. दत्तचरणांत अखंड चित्त ठेवुन अनासक्त वृत्तीने तो जीवन मुक्त राजा राज्य करीत होता.
एकदा कर्कोटक नागपुत्राला दुराचरण करतांना अर्जुनाने पाहिल्यावर त्याचे पारिपत्य करण्यासाठी त्याला बाणांनी घायाळ करुन बांधुन ठेवले. त्याचे राज्य हिरावुन स्वतः तिथे नर्मदा तीरी नवीन शहर वसवुन आपल्या सहस्रावधी स्रीयांसोबत राहु लागला. एकदा त्याने आपल्या सहस्र बाहुने नर्मदे ला बांध घालुन तिचा प्रवाह उलटा पुर्वे कडे फिरवला,आणि त्या प्रवाहात आपल्या हजार पत्निंसोबत श्रृंगारीक क्रीडा करुं लागला. मात्र नर्मदेचा पती पूर्वोदधी या अतिप्रसंगाने खवळुन राजा वर धावुन आला, पण सामर्थ्यवान अर्जुनाने त्याला जागीच खिळवुन त्यात उडी घालुन सहस्र हातांनी त्याला चोप द्यायला लागल्यावर तो समुद्र पळुन जाऊ लागल्याने त्याच्या आश्रयाने राहणारे जलचर पटापट मरुं लागले. समुद्रतळीच्या पाताळलोकांत हाहाकार माजला. शेवटी साक्षात समुद्रदेवता प्रकट होऊन अर्जुनाला शरण आल्या मुळे अर्जुनाने अभय दिले…
कार्तवीर्य दत्तचरणी लीन झालेला जीवन्मुक्त आहे हे ध्यानांत ठेवले पाहिजे त्याचे हे जीवनांतील वर्तन प्रारब्धाच्या सुत्रानुसार घडते. वास्तविक त्याच्या मनांत ना स्रीयाची आसक्ती, ना कर्तुत्वा चा अभिमान, ना राज्याची हाव, ना विजयाचा आनंद, ना पराभवाचे दुःख!
काॅम्पुटर प्रोग्रॅमसारखे विविध प्रतिकुल, अनुकुल घटनांमधुन उलगडत जाते. आत्मज्ञानी पुरुष फक्त साक्षित्वाने पाहत असतो. “आलिया भोगासी असावे सादर” या तुकारामाच्या उक्ती प्रमाणे देहप्रारब्ध भोगावेच लागते. या जीवन्मुक्ताला “रामाच्या घरचे सगळेच छान!” असते. राग,लोभ,द्वेष,शोक,मोह या कोणत्याही भावना त्याच्या जवळ पासही फटकत नाही. अशा रितीने राजा अर्जुन उदासीन वृत्तीने प्रारब्धाचे भोग भोगीत होता.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – १४.
वेदधर्मामुनी आपला प्रिय शिष्य संदीपाकाला पुढे सांगु लागले की, धार्मिकाग्रणी,विवेकशील राजा अर्जुन आपल्या आत्मानुसंधानात थोडाही खंड पडु न देता निरंतर धर्म कार्यात मग्न असे.प्रजेचे पालन पोटच्या अपत्या प्रमाणे करीत असे. सोबतच अनेक यज्ञ,व्रतवैकल्यादी,तपाचरण,दान,ब्राम्हणांची पुजा, त्याला विशेष आवड असलेले यज्ञांचे अनुष्ठान, तसेच दत्तप्रभुं ना आणखी प्रसन्न करण्यासाठी अश्वमेध यज्ञ पण करायला घेतला. कार्तवीर्याने सोडलेला शामकर्ण अश्वमेधाचा घोडा अडवण्याचे साहस भुमंडळांत कोणाचे च नसल्यामुळे त्याचे अश्वमेध यज्ञ निर्विघ्न यथासांग पार पडलेत. शंभर अश्वमेध यज्ञ करणारा सम्राट स्वर्गाचा अधिपती होतो.
आपले आसन अर्जुन बळकावेल ही भिती वाटल्याने इंद्राने देवसभा बोला वुन, अर्जुनाला ब्राम्हण प्रिय असल्या मुळे कोणत्यातरी देवाने ब्राम्हणरुपात त्याच्याकडे जाऊन अशी कांही मागणी करावी की, ज्यामुळे त्याचा अधःपात होऊन पुण्याचा क्षय होईल. अखंड धर्शाचराने त्याचे दिवसेंदिवस वाढणा र्या बळाचे खच्चीकरण करण्याचा हाच एक उयाय आहे, असा सर्वानुमते ठराव झाल्यावर सर्वात प्रभावी भगवान सूर्यदेवाची योजना केली.
सर्व देवांच्या आग्रहाने सूर्यदेव अर्जुनाची राजधानी महिष्पतीला आलेत
सकाळची धार्मिक कृत्ये आवरुन भोजनाच्या आधी वैश्वदेव राजा अर्जुन बलीहारण करायला बाहेर येण्याची नेमकी वेळ साधुन,अत्यंत कृश, पोट खयाटीलाव डोळे खोल गेलेले अशा ब्राम्हणस्वरुपात सुर्यदेव राजासमोर उभे राहिलेत. इतकी दुर्दशा या ब्राम्हणाची कशाने झाली? काय अपेक्षेने आला? असा विचार करत राजाने त्या भूदेवाला नमस्कार करुन विचारल्यावर, अत्यंत क्षीण आवाजांत तो ब्राम्हण म्हणाला, हे राजा! तूं अतिथी सत्कारात कसलीही उणीव ठेवीत नाहीस, अशी तुझी किर्ती ऐकुन आलो आहे.तू उदार,दानशूर, दयाळु असल्याचा लौकीक त्रैलोक्यात पसरला आहे. राज्य,धन,पुत्र किंवा स्री इतचेच काय, स्वतःच्या नाशिवंत शरीरा चा लोभ न धरतां दान करण्यास तूं मागे पुढे पाहत नाहीस, मला तृप्त करशील या गाढ विश्वासाने मी आलो आहे.
राजा म्हणाला, ब्राम्हण माझे दैवत असुन आपली तृप्ती करण्यास हा देह कारणी लागला तरी, आपली क्षुधा शांत करीन. त्यावर ब्राम्हण म्हणाला, राजन्! तुझ्या सात द्वीपाच्या राज्यातील सर्व वृक्ष, वेली, वनाचती खायला दिल्यास माझी क्षुधा शमेल.
हे जगावेगळे मागणे ऐकुन अर्जुना ने ओळखले की, जसे बळीच्या दारी याचक वेषाने गेलेले भगवान विष्णु सारखाच हा ब्राम्हण सुध्दा याचकाच्या वेषातील कोणी श्रेष्ठ देव आपल्या दारी आला आहे. देवांनाही उपकृत करण्या ची संधी मिळत असलेली पाहुन सर्वज्ञ राजाने त्याच्या तेजावरुन तो सूर्यदेवच असावा असे अनुमान करुन आपली इच्छा अवश्य पुरवीन. पण आपण कोण आहात? मी दिवाकर भट! लोकालोक पर्वतावरुन भुक मिटवण्यासाठी थेट तुझ्याकडे आलो. लोकालोक पर्वत हे सूर्याचे स्थान! राजा हर्षित झाला. गृहस्थाश्रमाचे सार्थक झाले. प्रत्यक्ष सुर्य नारायण याचक म्हणुन दारी आलेत,या पेक्षा मोठे भाग्य कोणते? वनस्पतीचे काय? दत्तप्रभूच्या कृपेने ज्या सिध्दी मिळाल्याहेत त्या प्रभावाने परत निर्माण करतां येतील हा विचार करुन पृथ्वीवरी ल सर्व वृक्षांचे दान करण्यास अर्जुन सज्ज झाल्यावर सूर्यनारायण देवता रुपात प्रकट झालेत.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.
!!! श्री दत्तात्रय !!!
भाग – १५.
सूर्यदर्शनाने सुखावलेल्या अर्जुनाने वृक्ष दान करुन त्यांना ग्रहण करण्याची विनंती केली.सूर्यदेवाला वृक्ष खाता यावे यासाठी अग्निच्या रुपात मागीतले. राजाने तेही मान्य केले, पण सर्व वृक्ष वाळविण्याचे सामर्थ्य आपल्या जवळ नसल्यामुळे आपणच मार्गदर्शन करावे. अर्जुनाची विनंती ऐकुन सूर्यांनी त्याला विशेष बाणांनी भरलेला भाता दिला.अर्जुनाने आपल्या हजार भुजांनी ५०० धनुष्यांना बाण जोडुन वृक्षांवर संधान साधले.प्रत्येक बाणाचे परत हजार बाण होऊन वृक्षांवर पडु लागल्या ने तात्काळ सर्वीकडच्या वृक्षांना बाणां नी वाळवुन टाकल्यावर त्या सर्व वृक्ष, लता, झुडपांना सूर्यदेवाने अग्निच्या रुपाने भस्मसात केले.
कार्तवीर्याने औदार्याच्या आणी दातृत्वाच्या भरात त्याने केलेले साहस, देवांना अपेक्षित असलेला परिणाम लगेच झाला. पृथ्वीवरच्या सर्व वृक्षांच्या दहनांत सहाजिकच त्रृषींच्या आश्रमांती ल झाडे वेलीही जळुन खाक झाल्या. महर्षी वशिष्ठ त्यावेळी समाधीत होते. भानावर आल्यावर शिष्यांना जळतीचे कारण विचारल्यावर, हे राजा अर्जुनाने केले असुन, आश्रमातीलच नाही तर पृथ्वीवरील सर्व वनस्पती झाल्याचे सांगीतले.हे ऐकुन वसिष्ठ त्रृषींनी क्रोधाने रागाच्या भरांत, कांहीही विचार न करतां जमदग्नी त्रृषींचा पुत्र तुझे हजार हात तोडुन डोकं उडवील असा भयंकर शाप दिला. त्या महान तपस्वी त्रृषींची वाणी खोटी कशी ठरेल?हीच दैवगती किंवा इश्वराची करणी होय. अशा रितीने सूर्याने देवांचे कार्य सिध्दीस नेले. सूर्य देवाने सगळे वृक्ष जाळुन स्वर्गलोकी निघुन गेले. इकडे अर्जुनाने योगसामर्थ्या ने पृथ्वीवरील वनस्पतीचे पुनरुज्जीवन केले.
ब्राम्हणशापाच्या परिणामाने राजा अर्जुनाची बुध्दीच पालटली.उद्दाम मोठ्या झालेल्या मुलांवर राज्यकारभार चालवायला सांगुन त्याने स्वर्गावर स्वारी केली. अतुलनीय एश्वर्यसंपन्न कार्तवीर्या ने प्रथम कुबेराच्या चैत्ररथ उद्यानात धुमाकुळ घालायला सुरुवात केली,हे पाहुन, कुबेराचे सेवक यक्ष, किन्नर त्याच्यावर धावुन गेल्यावर अर्जुन आपल्या सहस्र बाहुने एकटाच लढु लागला. यक्ष,किन्नर सैन्य घाबरुन पळत सुटले. मग अर्जुन स्वर्गाकढे वळला.तिथे तुंबळ युध्द केले. देव सुध्दा घायाळ होऊन व्याकुळ झाले. देवांना मूर्च्छित करुन नंदनवनांत मुक्काम केला. सची सह इंद्र तिथे आला असतां इद्राने त्वेषाने वज्र ऊचलले, तेवढ्यात विमानासहित इंद्र आणि सचीला ऊचलुन आकाशात फिरवु लागला. हे पाहुन सर्व देवसैन्य अर्जुनावर धावुन आले पण वज्रदेही महाबलाढ्य अर्जुनापुढे त्यांचे कांही चालेना. ऊलट अर्जुनाच्या मार्याने देवांची दैना उडाली. त्यांची शस्रेच काय पण अंगावरची वस्रेही गळुन पडली, कुणी लज्जेने, कुणी भितीने विनवणी करु लागले तेव्हा कार्तवीर्याने त्यांना सोडुन दिले.
या लाजिरवाण्या पराभवाने इंद्राने मेरु पर्वताचा आश्रय घेतला. तिथे देवांशी विचारविनियम करुन ब्रम्हदेवां कडे गार्हाणे नेले. त्यांची स्तुती करुन त्यांच्यावर कोसळलेले दुःख कथन करुन म्हणाले, योगीराज दत्तात्रयांच्या वराने उन्मत्त अर्जुनाने सरळ स्वर्गाववर चढाई करुन आम्हाला जर्जर केले. आपणच या कठीण प्रसंगातुनच आपण च बाहेर काढावे. भगवान लक्ष्मीरमण भक्तांचे कैवारी तेच आपल्याला तारती ल. ब्रम्हदेवासह इंद्रादी व मुख्य देव त्या त्रिभुवनमनोहर पितांबरधारी शंख,चक्र गदा धारण केलेल्या चतुर्भुज नारायणा ला शरण गेलेत. आपणच अवधुताच्या रुपाने कार्तवीर्य अर्जुनाला हवे ते “वर” दिल्याने त्याने देवांचीच स्थाने घेऊन आम्हाला पदभ्रष्र्ट केले, तरी आमचे अधिकारआम्हाला प्राप्त करुन द्यावेत. देवांचे निवेदन ऐकुन त्यांनी विचार केला की, वशिष्ठ मुनींच्या शापाने तो असा पेटलेला आहे. वास्तविक तो जीवन्मुक्त आहे. त्याला स्वर्गाची अभिलाषा बिलकुल नाही.प्रारब्धाच्या प्रेरणेने तो हे अहेतुक उद्योग करीत आहे. त्याच्याहुन श्रेष्ठ योध्याकडुन त्याला मरण येईल हा “वर” मीच त्याला दिला.शेवटी जमदग्नी व रेणुकेच्या पोटी अवतरुन अर्जुनाबरोब र युध्द करुन त्याला ठार करुन विदेह मुक्ती द्यावी लागेल.
क्रमशः संकलन – मिनाक्षी देशमुख.


