१८५१, अभंग :- साधन संपत्ती हेचि माझे धन । सकळ चरण:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १८५१
साधन संपत्ती हेचि माझे धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळीच नीट सुखरूप ॥धृपद॥
वैष्णवाचा संग राम नाम गाणे । मंडित भूषणे अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडीच चाली जावे पायी ॥३॥
मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटी कर उभी ॥४॥
तुका म्हणे केव्हा देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥

अर्थ

विठोबाचे चरण हीच आमची योगयोगादी आणि विवेकवैराग्यादी साधनसंपत्ती आहे ;व हेच आमचे धनही आहे. पंढरीची वाट म्हणजेच माझ्या माहेरची वाट आहे. ही वाट शांत , जवळची , सरळ आणि सुखाची आहे. वैष्णवांची संगती आणि त्यांच्या संगतीत ‘ राम ‘ नामांचे गीत गाणे हीच आमची भूषणे आणि अलंकार आहेत , आणि या अलंकार- भूषणांनी आम्ही सुशोभित झालो आहोत. ही भवनदी कधीच आड आली नाही ;किंबहुना ती नव्हतीच असे झाले आहे ;आणि कोरड्या पायाने चालत जावे , अशी स्थिती झाली आहे. माझे मायबाप श्रीरूक्मिणी-पांडुरंग , ही दोघे कटावर हात ठेऊन उभी असलेली माझी निरंतर वाट पाहात असतील. तुकाराम महाराज म्हणतात , मी पंढरीला जाऊन केव्हा श्रीपंढरीरायाचा कळस बघेन , असे मला झाले आहे ;आणि त्यामुळे आळस , निद्रा , भूक ही सारी पळाली आहेत.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading