१८५०, अभंग :- हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा:- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८५०
हरीकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची ॥१॥
म्हणोनि हिंडे मागे मागे । घरटी जागे घालितसे ॥धृपद॥
निर्लज्ज भोजे नाचे रंगी । भरते अंगी प्रेमाचे ॥२॥
तुका म्हणे विकले देवे । आपण भावे संवसाटी ॥३॥
अर्थ
देवाला हरिकथेची फार आवड आहे ;म्हणून तो हरिकथा करणा-या भक्तांची सेवा करतो. एवढेच नव्हे , तर ते भक्त जिकडे जातील , त्यांच्या मागे मागे हिंडत राहतो ;व ते ज्या जागी बसतील , त्यांच्याभोवती घिरट्या घालतो , किंवा रात्री ज्या भक्तांच्या घरी हरिनामकीर्तन चालू असते. त्या प्रत्येकाच्या घरी जागता पहारा घालीत फिरतो. हरिकथा चालू असते तेव्हा देव निर्लज्ज होऊन त्या रंगात नाचतो ;व त्या वेळी त्याच्या अंगात प्रेमाचे भरते येते. तुकाराम महाराज म्हणतात , हरिभक्तांच्या निःसीम व अनन्य प्रेमाच्या बदली स्वतःला देवाने विकून टाकले आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
