नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ९४२
किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोपाठी ॥१॥
लक्ष चौऱ्यांशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥धृपद॥
उपजल्या पिंडा मरण सांगाते । मरते उपजते सवेचि ते ॥२॥
तुका म्हणे माळ गुंतली राहाटी । गाडग्याची सुटी फुटलिया ॥३॥
अर्थ
या काळाचा किती वळसा सोसावा? कोठेही जा तरी हा काळसारखा पाठीमागे असतो. आहो या पांडुरंगाला शरण जाऊन तुम्ही आम्ही या चौऱ्यांशी लक्ष योनी तून आपली सोडवणूक करू घ्या. जन्म झाला कि मृत्यू होतो आणि मृत्यू झाला कि पुन्हा जन्म होतो. तुकाराम महाराज म्हणतात गाडग्याची माळ जशी असते एक खाली आला कि दुसरा भरतो आणि एखादे गाडगे फुटले कि ते मुक्त होते त्याप्रमाणे आपल्यातून द्वैताचा नाश झाला कि आपण हि मुक्त होऊ.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
