७९५, अभंग :- कलिधर्म मागे सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. ७९५
कलिधर्म मागे सांगितले संती । आचार सांडिती द्विजलोक ॥१॥
तेचि कळो आता येतसे प्रचिती । अधर्मा टेकती धर्म नव्हे ॥धृपद॥
तप व्रत करिता लागती सायास । पाळिता पिंडास गोड वाटे ॥२॥
देव म्हणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी का नव्हे ॥३॥
तुका म्हणे मज धरिता गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥४॥

अर्थ
कलयुगामध्ये भ्रष्ट ब्राम्हण आपला आचार विचार टाकतील असे पूर्वी संतानी सांगितले आहे. त्याचीच प्रचीती आता येत आहे सर्वानीच अधर्माचा आश्रय घेतला आहे. शास्त्रात सांगितलेली तप, साधना, तपश्चर्‍या , व्रते करण्यात खूप कष्ट पडतात म्हणून हे लोक आपला देह पाळतात. आपणच स्वतः देव आहे असे समजून देवळात जात नाहीत, मग ते संसारा वेगळे का राहत नाही? तुकाराम महाराज म्हणतात मी जर यांची परवा करून गप गुमान राहिलो तर ते योग्य नाही कारण हे प्राणी नरकात जातील.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading