४४०, विषयाचे सुख एथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड :- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. 440
विषयाचे सुख एथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ुर । यमाचे किंकर बहुसाल ॥धृपद॥
असिपत्री तरुवरखैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकी ॥२॥
तप्तभूमीवरी चालविती पायी । अग्नीस्तंभ बाही कवळविती ॥३॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥४॥

अर्थ
विषय सुख तिथे म्हणजे इहलोकांमध्ये भोगताना खूप गोड वाटते पण पुढे यमदंड भोगावा लागेल त्यावेळी अवघड होईल. यमलोकांत यमदूत तलवारीच्या पात्याप्रमाणे धारदार पाने असलेल्या वृक्षांना आलिंगन द्याण्यास सांगतात. खैराच्या निखाऱ्यातून चालवितात आणि उकळत्या तेलात बुडवितात. अतिशय तापलेल्या भूमीवर अनवाणी चालवतात. तापून लाल झालेल्या खांबाला मिठी मारावयास लावतात. तुकाराम महाराज म्हणतात पुढे असे हाल होणार आहे, म्हणुन अशा विषयासक्त लोकांना मी कळवळ्याने सांगतो कि आता पुन्हा गर्भवास भोगायला लावणाऱ्या उद्योगात पडू नका.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading