भारुड 2 :- विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला, संपूर्ण भारुड संत एकनाथ

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ....हे संपूर्ण भारुड पहा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ….
हे संपूर्ण भारुड पहा

सोडून सद्गुणांची कास धरावी, त्यातून मनःशांती मिळेल असे या भारुडात सांगितले आहे.
संत एकनाथांचे सर्व भारुड पहा व लिहून घ्या.
Sant knathanche Sarv Bharud Paha V Lihun Ghya.
See and Write Down All The Bharudas of Saint Eknath.
Bharud 2 :– Abab.. Vinchu Chavala Vrushchik chavala Sampoorn Bharud Sant Ekanaath

भारुड 2 :-
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला


विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥२॥
ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दने ॥४॥

अर्थ :-

उपहास आणि विनोदामधून परमार्थाचा मार्ग दाखवता येतो यावर कदाचित विश्वास बसणार नाही, पण संत एकनाथ महाराजांनी पाचशे वर्षांपूर्वी रचलेल्या भारुडांमधून हे काम करून ठेवले आहे.

शाहीर साबळे यांनी त्यांच्या काही भारुडांना आकर्षक चाली लावून आणि आपल्या बुलंद आवाजात गाऊन ‘भारुड’ या लोकगीताच्या प्रकारालाच एक महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे.

‘विंचू चावला’ या सर्वात जास्त लोकप्रिय भारुडामध्ये त्यांनी ‘अगगगगग, देवा रे देवा, काय मी करू’ वगैरे बरीचशी पदरची भर घालून त्याला अधिक उठाव आणला आणि काँटेंपररी बनवले असले तरी एकनाथ महाराजांची मूळ शब्दरचना तशीच राखली आहे. मूळ भारुड खाली दिले आहे. काम, क्रोध इत्यादि तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची (खरे तर मनाची) आग आग झाली. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण

आमचे युट्युब चॅनल पहा

सर्व संतांचे “भारुड” एकाच ठिकाणी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading