
पितृपक्ष १ श्राद्ध कसे करावे ! तिथी माहिती नाही . भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष ‘ म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती
कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द व तर्पण केल्याने सुख, समृध्दी व संततीची प्रार्थना केली जात असते.
पितृऋण, पितृकार्य , श्राद्ध, अन्नदान, तर्पण, महत्वाचे
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
भाग १
भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष ‘ म्हटले जाते. यात अश्विन प्रतिपदेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती
कृतज्ञता व्यक्त केली जात असते. यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द व तर्पण केल्याने सुख, समृध्दी व संततीची प्रार्थना केली जात असते.
जर तिथी लक्षात नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द केले जाते. यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख मार्कण्डेय पुराणात आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.
देश काले च पात्रे च श्रद्धया विधिनाच यत।
पितनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम ।।
म्हणजे देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधीयुक्त असे जे (अन्नादी) पितरांना उद्देशून ब्राह्मणांना दिले जाते त्याला ‘ श्राद्ध ‘ म्हणावे.
माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो. त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्युतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. ही चार ऋण फेडणे होय.
देवांना यज्ञ भाग देवून देव ऋण फेडता येते.
तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करत त्यांचा प्रचार प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषी ऋण फेडता येते. तर
पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
कुणाची विनाकारण निंदा करू नाही त्याने पितरांना त्रास होतो.
संत तुकाराम महाराज अभंगातून सांगतात कि
अभंग क्र.२७६७
हुंदकी पिसवी हलवीता दाढी । माळे मणी ओढी निंदेचेते ॥१॥
त्याचें फळ पाकीं यमाचे ते दंड । घर केलें कुंड कुंभपाकी ॥ध्रु.॥
क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥२॥
तुका म्हणे स्नान केलें मळ मूत्रें । जेविलीं पितरें अमंगळें ॥३॥
अर्थ
एखादा ढोंगी मनुष्य गोमुखीत म्हणजे जप करण्याच्या पिशवीत हात घालून माळ जपण्याचे सोंग करतो व काहीतरी जप करताना दाढी हालवत असतो परंतू तो माळ जपताना दुस-याची निंदा करण्याचेच विचार करत असतो. परंतू त्याचे फळ म्हणजे केवळ यमदंडच आहे आणि घोर कुंभीपाक नरक हेच त्याचे घर आहे. असा हा ढोंगी मनुष्य आपल्या अंत:करणात कामक्रोधरुपी मांगच आणतो आणि असा हा कुत्रा हुंगल्यासारखे जप करतो. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ढोंगी मनुष्याने स्वत: तर मलमूत्राने तर स्नान केलेच परंतू त्याच्या पितरांना देखील त्याने मलमूत्रे आणि विष्ठाच खाऊ घालून अमंगल केले आहे असे समजावे.”
हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेनुसार पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात जात नाहीत त्यांना भूतयोनी लाभते.
मेल्यावर आत्मा कुठे जातो ? सविस्तर महत्वाची माहिती
अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे. असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत. शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे.
ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे. यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत व गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. गृह्यसूत्रे, श्रुती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मण भोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला. सध्या आपण ज्याला श्राद्धविधी म्हणतो त्यामध्ये वरील तिन्ही अवस्था एकत्रित झाल्या आहेत..
पितर नरकात केंव्हा जातात संत तुकाराम महाराज म्हणतात.
लोभावर लक्ष ठेवून लोभाचे हीत मनात बाळगून जो न्यायधीश असत्य न्याय निवाडा करतो , त्याच्या पूर्वजांचे पतन होते
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२४४६
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥
त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥
कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥२॥
मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥
तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
अर्थ
लोभावर लक्ष ठेवून लोभाचे हीत मनात बाळगून जो न्यायधीश असत्य न्याय निवाडा करतो , त्याच्या पूर्वजांचे पतन होते आणि तो स्वतः व त्याचे पूर्वज देखील नरकात किडे होऊन पडतात असे जाणावे. त्याला निश्चयानेच कोटी गोहत्या केल्याचे पातक लागत असते. स्री प्रत्येक मासाला जो विटाळ स्रर्वत असते, तोच विटाळ खोटा न्याय निवाडा करणाऱ्या न्यायाधीश आपल्या पूर्वजांना पाजीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात अशा खोट्या न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशाला यम त्रास देऊन त्याला नक्कीच कठोर शासन करेल.
पितृपक्ष भाग २ श्राद्धाचे प्रकार व कधी, कुणी करावे
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
पितृपक्ष भाग २
धर्मग्रंथांमध्ये श्राद्धचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केले आहेत. त्यातील मुख्य श्राद्ध विधींची माहिती पुढीलप्रमाणे –
औध्वर्देहिक विधी :-
यामध्ये अंत्येष्टी संस्कारात अंतर्भूत असलेली विविध श्राद्धे येतात. ही सर्व श्राद्धे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होईपयर्ंतची (सपिंडीकरण श्राद्ध) असून मृत्यूनंतर एका वर्षात करावयाची असतात. अधिक खुलाशासाठी अंत्येष्टी विधीबद्दल या संकेतस्थळवरील माहिती वाचावी.
उदकुंभ श्राद्ध :-
मृत व्यक्ती प्रीत्यर्थ निधनानंतर प्रत्येक महिन्यात हे श्राद्ध करावयाचे असते. परंतु आजकाल हे शक्य होत नसल्याने वर्षश्राद्धापूर्वी सांकेतिक विधी म्हणून एकदाच हा श्राद्धविधी केला जातो.
नित्य श्राध्द :-
पितरांप्रीत्यर्थ रोज केल्या जाणार्या श्राद्धाला पितृयज्ञ/नित्यश्राद्ध म्हणतात. हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते.
वृद्धी श्राद्ध :-
प्रत्येक वर्षी मृत्यूतिथीला जे श्राद्ध करतात त्याला सांवत्सरिक किंवा वृद्धी श्राद्ध म्हणतात.
पार्वण श्राद्धे :-
तीर्थ श्राद्ध :-
काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री सर्व पितरांप्रीत्यर्थ केल्या जाणार्या श्राद्धाला ‘तीर्थ श्राद्ध’ म्हणतात.
महालय श्राद्ध :-
भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपयर्ंतच्या हिंदू वर्षातील काळाला ‘पितृपक्ष’ म्हणतात. या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.
हे श्राद्ध पितृत्रई म्हणजेच पिता, पितामह (आजोबा) व प्रपितामहा (पणजोबा); मातृत्रयी म्हणजे माता, पितामही, प्रपितामही; सापत्न माता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातूल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
नांदी श्राद्ध :-
पुत्रजन्म, उपनयन (मुंज), विवाह यांसारख्या संस्कारांच्या वेळी, तसेच विविध प्रकारची यज्ञकर्मे, गृहप्रवेश, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपासून शंभर वर्ष वयापयर्ंत दर पाच वर्षांनी करण्याची शांती इत्यादी शुभ प्रसंगी पितरांचे आशीर्वाद लाभावे याकरिता ‘नांदी श्राद्ध’ करतात.
त्रिपिंडी श्राद्ध :-
सतत तीन वर्षे श्राद्धकर्म न केल्यास पितरांना प्रेतत्व प्राप्त होते. यामुळे लौकिक जीवनात त्रास होऊ शकतो, असे धर्मशास्त्र सांगते. या त्रासाच्या निवारणासाठी प्रेतत्व पावलेल्या पितरांना पुनश्च पितृत्व प्राप्त व्हावे म्हणून त्रिपिंडी श्राद्ध करतात. हे श्राद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच केले जाते. त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर देखील प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे अपेक्षित असते.
सामान्यत:- दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला श्राद्ध करावे. फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे. मृत्युतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे. निश्चित मृत्युतिथी माहीत नसल्यास मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे.
हे श्राद्ध उदकाने म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावे. त्यामुळे नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावी. तेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील अमावास्येला (सर्व पितरी अमावास्येला) तरी श्राद्ध करावे.
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २२८२
कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन । कुळधर्मे निधान हाता चढे ॥१॥
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥धृपद॥
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचे ॥२॥
कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ॥३॥
तुका म्हणे कुळधर्म दावी देही देव । यथाविध भाव जरी होय ॥४॥
अर्थ
जो ज्या कुळात जन्मला त्या कुळाप्रमाणे वागला तर त्या कुळ धर्माप्रमाणे त्याला ज्ञान होते त्याला विवेक आणि वैराग्य अशी साधने प्राप्त होतात आणि परमार्थात त्याला जे खरे वर्म जे निदान पाहिजे आहे ते त्याच्या हाती लागते. जो कुळ धर्माचे आचरण करतो व त्याच्या हातून योग्य भक्ती करतो त्याला योग्य गती आणि विश्रांती प्राप्त होईल. कुळ धर्माप्रमाणे आचरण केले तर दया उत्पन्न होते दुसऱ्यावर उपकार करण्याचे पुण्य होते आणि सर्व साधनांचे सारच कुळधर्म आहे. कुळ धर्माप्रमाणे आचरण केले तर आपल्याला महत्त्व प्राप्त होऊन मान-सन्मान मिळतो आणि त्यामुळे आपले परलोकीचे पित्र देखील पावन होतात. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या कुळ धर्माप्रमाणे आपण आचरण केले तर ते कुळधर्म आपल्याला आपल्या देहामध्ये देव आहे असे दाखवून देते परंतु जर आपले आपल्या कुळ धर्मावर यथाविधी भक्तिभाव असेल तरच.
पितृपक्ष भाग ३ श्राद्ध केल्याने काय होते ?
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
पितृपक्ष भाग ३
श्राद्ध कोणी व का करावे?
सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे. अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी श्राद्ध करावे. पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपीडा शांतीसाठी श्राद्ध करावे.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
कायदेशीर संकट, सजकीय पीडा निवारणासाठी श्राद्ध करावे.कुटुंबात वादविवाद, दाम्पत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे. अस्थिरता, राग, वैमनस्य संपविण्यासाठी श्राद्ध करावे. घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.
वैशाख शुक्ल तृतीया, कार्तिक शुक्ल नवमी, अश्विन/भाद्रपद कृष्ण द्वादशी व पौष/मार्गशीर्षातील अमावस्या या चार तिथी आदि तिथी असून या दिवशी श्राध्द कार्य श्रेयस्कर ठरते.
श्राध्द केल्याने पितरांची संतुष्टी व व्यक्तिगत उन्नयनाचे पर्व यामधून बोध संपादन केला जातो. कृतज्ञता व समाधानाचा सुगंध दरवळतो. पितरांची पूजा केल्याने मनुष्य आयु, पुत्र, यश, स्वर्ग, पुष्टि, बल,श्री,पशुधन, सुख, धन , धन्य संपादित करतो. देवकार्यापेक्षा पितृकार्य प्राधान्याने केले पाहिजे. देवतांपेक्षा पितरांची प्रसन्नता अधिक कल्याणकारी आहे. श्रद्धा, निष्ठा व प्रतीकात्मक संकल्प यांचे बीजारोपण व अंकुरण प्रसन्नतेत समाविष्ट आहे. समस्त देव, पितर, महायोगी स्वधा व स्वाहा – आम्ही सर्वांना नमस्कार करतो. हे सर्व नित्य शाश्वत फल प्रदाता आहेत.
गरुड पुराणानुसार समयानुसार श्राध्द केल्याने कुळात कोणीही दु:खी राहत नाही. पितरांची पूजा मनुष्यास आयु, पुत्र, यश , स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, श्री, पशु, सुख, धन धान्य यांनी सम्प्राप्त होतो. देवकार्यापेक्षा पितृकार्याचे विशेष महत्व आहे. देवांपेक्षा पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे.
वैशिष्ठ्यपूर्ण भारतीय संस्कृती जीवनभर विभिन्न संस्कारांनी, धर्मपालनाने स्मुन्नत करतेच, मृत्यु उपरांत अंत्येष्टी व उत्तम गती साठी योग्यसंस्कारांचे दिग्दर्शन विष्णू, वराह, वायू, मत्स्य या पुराणांमार्फत तसेच महाभारत , मनुस्मृती यामुल्यसंवर्धक ग्रंथा द्वारे करते. यात श्राध्द महिमा वर्णन आढळते. भाद्रपद कृष्ण पक्ष हिंदू धर्म श्राध्द पर्वरूपाने साजरा करतो. दिव्य आत्मा अवतरण यामुळे संभवते. ज्यांनी अष्टौ प्रहरमेहनतीने साधन सामुग्री, संस्कार, सामाजिक कर्तव्याची जाणीव देवून जीवनजगण्याचा विश्वास निर्माण केला त्यांच्या व ईश्वरी प्रसन्नतेसाठी, हृद्यशुद्धीसाठी सकाम-निष्कामतेने श्राध्द केले पाहिजे.
देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च ।
नम: स्वधायै स्वाहायै नित्यमेव भवन्त्युत ।।
विधी विधानाची त्रुटी, मंत्रोच्चार येत नसतांना ४ बीजमंत्रसम्पुठीत मंत्र पितरांची तृप्ती,
मांगल्य-प्रभाव व उत्तम सद्गती करण्यास समर्थ आहे. श्राध्द फलित कर्ता असा मंत्र आहे.
*संकलन :- अशोककाका कुलकर्णी
पितृकार्य महत्वाची माहिती
श्राद्धाचे भोजन केल्यास प्रायश्चित्ते घ्यावे लागतात ?
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
श्राद्धी भोजन केल्यास प्रायश्चित्ते
दर्शश्राद्धी भोजन केल्यास सहा प्राणायाम. महालयादि श्राद्धी व तीन वर्षानंतच्या प्रतिसांवत्सिक श्राद्धात भोजन केल्यास ६ प्राणायाम किंवा गायत्री मंत्राने दहा वेळ अभिमंत्रिक केलेले उदक प्राशन करावे. याप्रमाणे प्रायश्चित्ते न सांगितलेल्या इतर श्राद्धातही असे जलपान करावे. वृद्धिश्राद्धात भोजन केल्यास ३ प्राणायाम करावे. जातकर्मापासून चौलपर्यंत जे संस्कार त्यांच्या अंगभूत वृद्धिश्राद्धी सांतपनकृच्छ्र करावे, किंवा जातकर्मांगभूत श्राद्धी चांद्रायण करावे. इतर संस्कारांगभूत वृद्धिश्राद्धी उपवास करावा. सीमंत संस्कारात व त्या संस्काराचे अंगभूत श्राद्धात चांद्रायण करावे.
आपत्काली दहा दिवसपर्यंत असलेली नवसंज्ञक श्राद्धे व एकादशाह श्राद्ध यात श्राद्धभोजन केले असता प्राजापत्यकृच्छ्र करावे. बाराव्या दिवशी असलेल्या सपिंडी श्राद्धात व ऊनमासिक श्राद्धात भोजन केल्यास पादोनकृच्छ्र करावे. द्वितीय मासिक, त्रैपक्षिक, ऊनषाण्मासिक व ऊनादिक या श्राद्धी अर्धकृच्छ्र करावे.
इतर मसिके प्रथमाद्विक व वर्षांती केलेल्या सपिंडी श्राद्धी भोजन केल्यास पादकृच्छ्र किंवा उपोशण करावे. गुरूस द्रव्य देण्यासाठी श्राद्ध भोजन केल्यास सर्वत्र उक्त प्रायःश्चित्ताचे अर्ध प्रायःश्चित्त करावे. जप करणारा असेल तर त्याने चतुर्थांश करावे. आपत्काल नसता ऊनमासिकापर्यंत श्राद्धी चांद्रायण व प्राजापत्य ही दोनही करावी. द्वितीयमासिकादिक ४ श्राद्धि पादोनकृच्छ्र करावे.
त्रैमासिकादिक पूर्वा सांगितली त्यात अर्धकृच्छ्र करावे. प्रथमादिक श्राद्धी पादोनकृच्छ्र व द्वितीय तृतीय या अधिक श्राद्धी एक उपोषण करावे. क्षत्रियाचे श्राद्ध असेल तर याहून दुप्पट; वैश्यश्राद्धी तिप्पट शूद्रश्राद्धी सर्वत्र चौपट प्रायःश्चित्त जाणावे. चांडाल, विष, जल, सर्प, पशू, इत्यादिकांनी मृत, पतित किंवा क्लीब, इत्यादिकांच्या नवश्राद्धी भोजन केल्यास चांद्रायण करावे. एकादशाहात श्राद्धी पराक व चांद्रायण करावे. द्वादशाहादि श्राद्धी पराक करावा. द्विमासिकादिक ४ श्राद्धी अतिकृच्छ्र करावा.
इतर मासिक श्राद्धी कृच्छ्र, व आद्विक श्राद्धि पादकृच्छ्र करावे. अभ्यास असता सर्व द्विगुण करावे. आमश्राद्ध, हिरण्यश्राद्ध व सांकल्पिक श्राद्ध यांचे ठायी त्या त्या उक्त प्रायःश्चित्ताचे अर्धे प्रायश्चित्त जाणावे. यति व ब्रह्मचारी पूर्वोक्त प्रायश्चित्ते करून ३ उपवास, १०० प्राणायाम व घृतप्राशन हे अधीक करावे; आपत्ति नसता दुप्पट करावे. दर्शादि श्राद्धी संन्यासी व ब्रह्मचारी गृहस्थाश्रम्याप्रमाणेच प्रायःश्चित्त करावे. ब्रह्मचार्याने चौल संस्कारी भोजन केल्यास कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. सीमंत संस्कारी चांद्रायण, अन्य संस्कारी उपवास व एकादशाह श्राद्धी भोजन केले असता चांद्रायण व पुनः संस्कार करावे, असे हेमाद्रिग्रंथात सांगितले आहे.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी
पितृकार्य महत्वाची माहिती
श्राद्ध / पितृपाक्षाविषयी महत्वाचे ११ प्रश्नोत्तरे
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
श्राद्ध / पितृपाक्षाविषयी शंका समाधान
१. प्रश्न :- घरात / कुळात चालू वर्षात मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?
उत्तर :- नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.
२. प्रश्न :- घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
उत्तर :- सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.
३. प्रश्न :- ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?
उत्तर :- पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.
४. प्रश्न :- ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?
उत्तर :- शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.
५. प्रश्न :- संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?
उत्तर :- अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.
६. प्रश्न :- पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
उत्तर :- भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.
७. प्रश्न :- श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?
उत्तर :- पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.
८. प्रश्न :- अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?
उत्तर :- पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात,तूप,५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.
मंत्र :
मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम |
बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||
९. प्रश्न :- मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्यचा अधिकार कोणाला असतो?:
उत्तर :- नवरात्रच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.
ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय. नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.
१०. प्रश्न :- पितृपक्षात पारायण करता येते का ?
उत्तर :- हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.
११. प्रश्न :- दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?
उत्तर :- सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा (नित्यासेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी) या पंचमहायज्ञासाठी फक्त ५ मिनिटे लागतात.
दर अमावस्येला हिरण्यदान करावे. (१ जाणवे, पेढे, ५ / १० रु. दक्षिणा इत्यादी ब्राम्हणाला दान करावेत) . दर अमावस्येला १किलो कोळसा व ३ नारळ घेऊन त्यावर १ माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे.
प्रखर पितृदोष असल्यास श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी करावा. तसेच मातृगया (सिद्धापूर,गुजराथ) येथे जाऊन पिंडदान करावे.
दरमहा किंवा वर्षातून १ पारायण “सुलभ भागवत ग्रंथाचे करावे” यामुळे पितरांना मुक्ती मिळते. भागवत पारायण करतांना “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावल्यास जन्म-जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात.
१२ . पितरांना कोणत्या बोटाने जालांजली द्यावी. (तर्पण)
त्याचे उत्तर असे आहे की, देवाला, ऋषी, आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे, करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला, गुरुंना, साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे, ऋषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे, आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.
१२. एकादशी करण्याने पितर नीच योनीत अडकले असल्यास त्यांची मुक्ती होते. खासकरून ‘मोक्षदा एकादशी’ पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. यादिवशी उपवास केल्याने पुण्य प्राप्ती होते.
१३. नौमित्तिक काम्य कर्म कोणती .
संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत १८ व्या अध्यायात ओवी १०९ ते १११ मध्ये सांगतात
हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें । द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें ॥109॥
मग म्हणतात:- ज्याप्रमाणे आपल्या जवळील द्रव्ये टाकून दिली म्हणजे त्यापासून उत्पन्न होणारे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या काम्यकर्मांचा त्याग करणे म्हणजे मनातील वासना समूळ नाहीतशा करणे होय ॥109॥
110-18
आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें । का मातापितरमरणें । अंकित जे दिवस ॥110॥
आणि चंद्रग्रहण ह्या पर्वणीच्या दिवशी किंवा माता पितरांच्या श्राद्ध तिथीस, ॥110॥
111-18
अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें । तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा ॥111॥
अथवा काकबळी टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता, जी जी कर्मे करावी लागतात ति नैमित्तिक कर्मे होतं ॥111॥
१४. लग्नातील धर्मपत्नीला देलेली सात वचन पैकीं एक वाचन पितरांचे असते का ?
होय लग्न लागतांना नवी मुलगी आपल्या भावी पतीकडून खालील वाचन घेते.
द्वितीय वचन इस प्रकार है-
हव्यप्रदानैरमरान् पितृश्चं कव्यं प्रदानैर्यदि पूजयेथा:।
वामांगमायामि तदा त्वदीयं जगाद कन्या वचनं द्वितीयकम्॥
अर्थ – इस श्लोकके अनुसार कन्या वरसे कहती है कि यदि तुम हव्य देकर देवताओंको और कव्य देकर पितरोंकी पूजा करोगे तब ही मैं तुम्हारे वाम अंगमें आ सकती हूं अर्थात् पत्नी बन सकती हूं ।
१५. भीष्मपंचकव्रत या व्रतात पितरांचा उल्लेख कशासाठी आहे ?
भीष्मपंचकव्रत या मध्ये खालील वरण आहेतुलसीकाष्ठांच्या मालेने भूषित असा पितर अथवा देव यांची पूजा वगैरे करील तर त्याचे ते कर्म द्विगुणित होते” अशी जी पद्मपुराणामध्ये पातालखंडात ७९ व्या अध्यायामध्ये प्रत्यक्ष वचने आहेत .
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५९
धर्म वसे जेथें । सर्व कार्य होय तेथें ।
पित्यासहित मनोरथे । सिद्धि पावेल सर्वथा ॥
धन्य धन्य पितृवत । धन्य धन्य धर्मकृतार्थ ।
धन्य धन्य वेदाचा मतितार्थ । रामकृष्ण मुखींनाम ॥
जंववरी आयुष्य आहे । तंववरी हरीची सोये ।
हरि हरि मुख राहे । तो सुखी होय अंती देखा ॥
ज्ञान ध्याने निवे संध्या । ज्ञान विज्ञान हाचि धंदा ।
रामकृष्ण हरि मुकुंदा । परमानंदा जगद्गुरू ॥
ज्ञानदेवें सुकाळ केला । हरि हृदयी साठविला ।
हरिपाठ हाचि साधिला । अनंत अनंत परवडी ॥
अर्थ:-
ज्या ठिकाणी धर्माचरण असते तेथे सर्व कार्य निर्वेध होतात पितरांच्या इच्छा पूर्ण होतात व सिध्दी ही प्राप्त होते. ज्या मुखी रामकृष्ण नाम आहे त्या पितृव्रत धर्मकार्य धन्य होते व तोच खरा वेदांचा मतितार्थ जाणतो.
ज्या मुखात सतत हरि आहे असे आयुष्य जगणारा तो अंती ही सुखीच राहतो. रामकृष्ण हरि मुकुंद ह्या नामोच्चरणा बरोबर त्याची संध्यादी कर्म संपुन जातात. अशा पध्दतीने हरिपाठ करणारे हरिला हृदयात साठवतात व त्यांच्या साठी ब्रह्मविज्ञेचा सुकाळ होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-५ रे, नामग्रहण अभंग १५८
सकळ संप्रदाय श्रीहरि । जो बैसोनि जप करी ।
जिव्हे महादेवाचे अंतरी । सर्वकाळ वसतसे ॥
रामनामें जप करी । तोचि तरे भवसागरीं ।
पितरांसहित निर्धारी । वैकुंठपुरीं पावले ॥
नित्य सत्य समाधान । निर्मळ करावें मन ।
नित्य तयासीे नारायण । वैकुंठवास करील ॥
बापरखुमादेविवर सिद्धि । तरुणोपाय हेचि बुद्धि ।
कृपा करील कृपानिधी । ऐसिया भक्तांशी जाणावें ॥
अर्थ:-
महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो.
जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-५ वे, गुरुवर्णन अभंग ७०३
गुरूज्ञान नाहीं ज्यासी । तरुणोपाय नाहीं त्याशी । तो नावडे ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला ॥१॥ देव धर्म नेणे कांहीं । धरी प्रपंचाची सोई । त्या कोठेही थार नाहीं । हे वेद बोलिलासे ॥२॥ कृष्णकथा जो नायके । रामनाम न म्हणें मुखें । तया सोसकोटी दुःखें । जन्म योनी भोगू लागेल ॥३॥ ज्ञानदेवी अभ्यास केला । सर्व संसार हा तारिला । रामकृष्णे भवपाश तोडिला । सर्व पितरांसहित ॥४॥
अर्थ:-
ज्या पुरूषाला गुरूंचा अधिकार कळत नाही. त्याला संसार समुद्रातून तरून जाता येणार नाही. इतकेच काय पण तो देवाला देखील आवडत नाही. त्याचा जन्म निष्फळ आहे. ज्याला देवधर्म आवडत नाहीत व प्रपंचाची कास धरून चालला आहे. त्याला ऐहिक अगर पारलौकिक कुठेही सुख मिळणार नाही.हे वेदानीच सांगितले आहे. जो कृष्णकथा ऐकत नाही मुखाने राम राम म्हणत नाही त्या पुरूषाला कोट्यवधी जन्म घेऊन नरकयोनीत दुःख भोगावे लागतील. मी श्रीगुरूचे सहाय्य घेऊन अनेक जन्मामध्ये भगवन्नामस्मरणादि अभ्यास केला म्हणून हा संसारसमुद्र तरून गेलो. मी स्वतःच तरून गेलो असे नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा संसार पाश तोडून मी त्यांना मुक्त केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
तीर्थ स्नान व पितर यांचा काही संबंध आहे का ?
नन्दिनी नलिनी सीता मालतीच महापगा ।
विष्णुपादाब्ज संभूता गङ्गा त्रिपथ गामिनी ।।
भागीरथी भोगवती जान्हवी त्रिदशेश्वरी ।
द्वादशैतानी नामानि यत्र यत्र जलाशये।
स्नानोद्यत:स्मरेन्नित्यं तत्रतत्र वसाम्यहम् ।। (वाधुलस्मृति)
हा श्लोक म्हणुन गंगादि तीर्थांचे आवाहन करावे व नंतरच स्नान करावे.
स्नान झाल्यावर देव ऋषि व पितरांचे तर्पण करणे हि आवश्यक आहे ते केल्याशिवाय वस्त्र पिऴु नयेत कारण त्या वस्त्रांवरुन पडणारे पाणी जे तीर्थजल आहे ते ग्रहण करायला देव व पितर वायुरुपात येतात तर्पणाआधीच वस्त्र पिऴले तर ते निराश होवुन परत जातात.
वायुभूतास्तु गच्छन्ति तृषार्ता:सलिलार्थिन:।
तस्मान्न पीडयेद्वस्त्रमकृत्वा पितृतर्पणम् ।।
निराशास्ते निवर्तन्ते वस्त्रनिष्पीडने कृते ।
तस्मान्न पीडयेद्वस्त्रं ये केच इति मंत्रत:।। (वाधुलस्मृति 58-60)
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. 148
याचा कोणी करी पक्ष ।तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठी पावे दुःखाचा विभाग ।पूर्वजांसि लाग निरयदंडी ॥धृपद॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचे अन्न ।मद्यपानाचे समान ॥३॥
अर्थ:- कन्येचि विक्रि करणार्या पापी मनुष्याची बाजू घेणारा पापीच आहे. असा मनुष्य पापी माणसांची बाजु जर कोणी घेत असेल तर तो फुकट दुख विकत घेतो व पितरांना नरकवास भोगायला लावतो. अश्या पापी मनुष्याला जर राज्याने देखील शिक्षा केली नाही तर तो राजाहि पापी ठरतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पापी मनुष्याचे अन्न सेवन करू नये; कारण ते मद्यपानासमान आहे.
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 1
अभंग क्र.९७
काही नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ।
वाया मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ।
जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥धृपद॥
अखंड अशुभ वाणी । खरे न बोले स्वप्नी ।
पापी तयाहुनी । नाही आणीक दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूती दया नाही ज्याला ।
पाठी लागे आल्या । अतिताचे द्वारेशी ॥३॥
काही संतांचे पूजन । न घडे तीर्थांचे भ्रमण ।
यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनी । मनुष्यपणा केली हानी ।
देवा विसरूनी । गेली म्हणता मी माझे ॥५॥
अर्थ
दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल असतो .त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवास भोगत असतात .त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुध्दा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडणार नाही .तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलुन देतो .त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल .तुकाराम महाराज म्हणतात , अश्या व्यक्ती जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यात ते रमुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही .
५८, अभंग :- बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायी:- संत तुकाराम सार्थ गाथा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
त्वरित शोध तंत्राचा वापर करा
येथे कोणताही शब्द,अक्षर, शोधा,
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 1
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग ५८
अभंग क्र.५८
बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायी ॥१॥
थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥धृपद॥
विषयांचे चरवणी । केली आयुष्याची गाळणी ॥२॥
तुका म्हणे लडा । नाही दया देव धोंडा ॥३॥
अर्थ
एका ढोंगी, कर्मठ मनुष्याने आपल्या माता-पित्याचे श्राद्ध घातले, आईसाठी सवासिन म्हणून आपल्या बायकोला बसवले व वडिलांच्या जागी ब्राम्हण म्हणून आपणच बसला .त्या मुळे त्याचे श्राद्ध निष्फळ झाले; कारण या गोष्टी धर्मशास्त्रानुसार ग्राह्य नाहीत .असे विषयलोलुपता गृहस्थ स्वत:च्या जीवनाचा नाश स्वतःच करून घेतात .तुकाराम महाराज म्हणतात , असे पाखंडी, अहंकारी लोक दगडालाच देव मानतात (अर्थ तपासा)
५०, अभंग :- आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला:- संत तुकाराम सार्थ गाथा
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
त्वरित शोध तंत्राचा वापर करा
येथे कोणताही शब्द,अक्षर, शोधा,
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang 1
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग .५०
अभंग क्र.५०
आहाकटा त्याचे करिती पितर । वंशी दुराचार पुत्र झाला ॥१॥
गळेचि ना गर्भ नव्हेचि का वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥धृपद॥
परपीडे परद्वारी सावधान । सादरचि मन अभाग्याचे ॥२॥
न मळिता निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥३॥
परउपकार पुण्य त्या वावडे । विषाचे ते कीडे दुग्धी मरे ॥४॥
तुका म्हणे विटाळाचीच तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥५॥
अर्थ
ज्या घरामधे दुर्वर्तनी पुत्र जन्माला येतो, त्याचे पीतर दुःखाने आक्रोश करत असतात .अश्या पुत्रांचा त्याच्या मातेच्या उदरात असतानाच गर्भपात का झाला नाही? त्याची माता वांझ का राहिली नाही? अश्या पुत्राला तिने का बरे जन्म दिला? अशा अभाग्याचे मन सतत परपीड़ा, परनिंदा करण्यात रमते .त्याला एखाद्या दिवशी निंदा, चहाडी करण्यास मिळाली नाही तर उपवास घाडल्याप्रमाणे वाटते .परोपकार, पूण्य यांचे त्याला वावडे असते जसे विषारी कीडे दुधात टाकल्यावर मरून जातात तसाच हा आहे .तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य साक्षात विटाळाची मूर्ति असतो; त्याच्या मनामधे दया, क्षमा, शांतीचा लवलेश नसतो .
प्रभू श्रीरामाने माता कैकईला दंड कां नाही दिला ?
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
रामायणातील बोध, म्हणजे मानवी जीवनाचा शोध.
एकदा संध्याकाळच्या वेळी सरयूच्या तीरावर…..३ भावांसह फिरण्यास गेले असता श्रीरामाला भरतानं म्हटलं , “एक गोष्ट सांगाल का दादा? माता कैकईनं तुम्हाला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कटकारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नाही का वाटत तुम्हाला?
तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास ?”
यावर रामचंद्र हसले आणि म्हणाले, “तुला माहित आहे भरता !! एखाद्या कुलात जेव्हा चरित्रवान और धर्मपरायण पुत्र जन्म घेतो, तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पीढ्यांतील पितरांच्या अपराधाचं क्षालन करतं. ज्या आईनं तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला असेल , तिला दंड कसा बरं देता येईल भरता ?”
यावर भरताचं कांही समाधान झालं नाही. तो म्हणाला, “हा तर मोह आहे दादा; आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा तू कृपा करून मला एका राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकईला दंड कां नाही दिलास ?…….असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय.”
(श्रीराम गंभीर झाले )…… काही क्षण मौन राहून श्रीरामचंद्र म्हणाले, “हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणा व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच या सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे !! माता कैकईनं आपल्या केवळ एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगला आहे. वनवासाच्या (१४) चौदा वर्षांत आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो ;
पण माता कैकई प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिनं आपला पति गमावला, आपले चारही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख – सन्मान तीनं गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणिवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा ……. परिवारतील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत; पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देऊ शकणार मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्या मुळेच (अकारण) माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला.”
रामाच्या नेत्रांतून अश्रूंच्या धारा वाहात होत्या, आणि भरतासह सर्व भाऊ नि:शब्द होऊन गेले. रामचंद्र पुन्हा सांगू लागले ……. “आणि तिच्या या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी कां समजायचं भरता !!…… जर मला वनवास झाला नसता] , तर हे जग ‘भरत’ आणि ‘लक्ष्मण’ या भावंडांचं अतुल्य भ्रातृ – प्रेम कसं पाहू शकलं असतं ? मी तर केवळ माझ्या माता पित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाची आज्ञा नसतानाही केवळ माझ्यासाठी १४ वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं कां ?”
भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. कांहीही न बोलता त्यानं श्रीरामांना प्रेमभरानं आलिंगन दिलं. !!
✒️ राम काही कुठला नारा नाही, राम एक आचरण आहे, एक चरित्र आहे , जीवन जगण्याची एक शैली आहे.
धनलोभीं जे लुब्धक । स्वप्नीं न देखती सुख ।
जन्मादारभ्य देख । भोगिती नरक अनिवार ॥ १७ ॥
जय श्रीराम
पितृस्तुति
पितृस्तुति
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
पितृस्तुति*
रुचिरुवाच
नमस्येsहं पितॄन् भक्त्या ये वसन्त्यधिदैवतम् ।
देवैरपि हि तर्प्यन्ते ये श्राद्धेषु स्वधोत्तरैः ॥ १ ॥
नमस्येsहं पितॄन् स्वर्गे ये तर्प्यन्ते महर्षिभिः ।
श्राद्धैर्मनोमयैर्भक्त्या भुक्तिमुक्तिमभीप्सुभि: ॥ २ ॥
नमस्येsहं पितॄन् स्वर्गे सिद्धाः संतर्पयन्ति यान् ।
श्राद्धेषु दिव्यैः सकलैरुपहारैरनुत्तमैः ॥ ३ ॥
नमस्येsहं पितॄन् भक्त्या येsर्च्यन्ते गुह्यकैर्दिवि ।
तन्मयत्वेन वाञ्छद्भिर्ॠद्धिमात्यन्तिकीं पराम् ॥ ४ ॥
नमस्येsहं पितॄन् मर्त्यैरर्च्यन्ते भुवि ये सदा ।
श्राद्धेषु श्राद्धयाभीष्टलोकपुष्टिप्रदायिनः ॥ ५ ॥
नमस्येsहं पितॄन् विप्रैरर्च्यन्ते भुवि ये सदा ।
वाञ्छिताभीष्टलाभाय प्राजापत्यप्रदायिनः ॥ ६ ॥
नमस्येsहं पितॄन् ये वै तर्प्यन्तेsरण्यवासिभिः ।
वन्यैः श्राद्धैर्यताहारैस्तपोनिर्धूतकल्मषैः ॥ ७ ॥
नमस्येsहं पितॄन् विप्रैर्नैष्ठिकैर्धर्मचारिभिः ।
ये संयतात्मभिर्नित्यं संतर्प्यन्ते समाधिभिः ॥ ८ ॥
नमस्येsहं पितॄञ्छ्राद्धै राजन्यास्तर्पयन्ति यान् ।
कव्यैरशेषैर्विधिवल्लोकद्वयफलप्रदान् ॥ ९ ॥
नमस्येsहं पितॄन् वैश्यैरर्च्यन्ते भुवि ये सदा ।
स्वकर्माभिरतैर्न्नित्यं पुष्पधूपान्नवारिभिः ॥ १० ॥
नमस्येsहं पितॄञ्छ्राद्धे शूद्रैरपि च भक्तितः ।
संतर्प्यन्ते जगत्कृत्स्नं नाम्ना ख्याताः सुकालिनः ॥ ११ ॥
नमस्येsहं पितॄञ्छ्राद्धे पाताले ये महासुरैः ।
संतर्प्यन्ते सुधाहारास्त्यक्तदम्भमदैः सदा ॥ १२ ॥
नमस्येsहं पितॄञ्छ्राद्धैरर्च्यन्ते ये रसातले ।
भोगैरशेषैर्विधिवन्नागैः कामानभीप्सुभिः ॥ १३ ॥
नमस्येsहं पितॄञ्छ्राद्धैः सर्पैः संतर्पितान् सदा ।
तत्रैव विधिवन्मन्त्रभोगसम्पत्समन्वितैः ॥ १४ ॥
पितॄन्नमस्ये निवसन्ति साक्षाद्दे देवलोकेsथ महीतले वा ।
तथान्तरिक्षे च सुरारिपूज्यास्ते वै प्रतीच्छन्तु मयोपनीतम् ॥ १५ ॥
पितॄन्नमस्ये परमार्थभूता ये वै विमाने नोवसन्त्यमूर्ताः ।
यजन्ति यानस्तमलैर्मनोभिर्योगीश्र्वराः क्लेशविमुक्तिहेतून् ॥ १६ ॥
पितॄन्नमस्ये दिवि ये च मूर्त्ताः स्वधाभुजः काम्यफलाभिसन्धौ ।
प्रदानशक्ताः सकलेप्सितानां विमुक्तिदा येsनभिसंहितेषु ॥ १७ ॥
तृप्यन्तु तेsस्मिन्पितरः समस्ता इच्छावतां ये प्रदिशन्ति कामान् ।
सुरत्वमिन्द्रत्वमितोsधिकं वा गजाश्र्वरत्नानि महागृहाणि ॥ १८ ॥
सोमस्य ये रश्मिषु येsर्कबिम्बे शुक्ले विमाने च सदा वसन्ति ।
तृप्यन्तु तेsस्मिन्पितरोsन्नतोयैर्गन्धादिना पुष्टिमितो व्रजन्तु ॥ १९ ॥
येषां हुतेsग्रौ हविषा च तृप्तिर्ये भुञ्जते विप्रशरीरसंस्थाः ।
ये पिण्डदानेन मुदं प्रयान्ति तृप्यन्तु तेsस्मिन्पितरोsन्नतोयैः ॥ २० ॥
ये खड्गमांसेन सुरैरभीष्टैः कृष्णैस्तिलैर्दिव्यमनोहरैश्र्च ।
कालेन शाकेन महर्षिवर्यैः संप्रीणितास्ते मुदमत्र यान्तु ॥ २१ ॥
कव्यान्यशेषाणि च यान्यभीष्टान्यतीव तेषां मम पूजितानाम् ।
तेषां च सांनिध्यमिहास्तु पुष्पगन्धाम्बुभोज्येषु मया कृतेषु ॥ २२ ॥
दिने दिने ये प्रतिगृह्णतेsर्चा मासान्तपूज्या भुवि येsष्टकासु ।
ये वत्सरान्तेsभ्युदये च पूज्याः प्रयान्तु ते मे पितरोsत्र तुष्टिम् ॥ २३ ॥
पूज्या द्विजानां कुमुदेन्दुभासो ये क्षत्रियाणां ज्वलनार्कवर्णाः ।
तथा विशां ये कनकावदाता नीलीप्रभाः शूद्रजनस्य ये च ॥ २४ ॥
तेsस्मिन्समस्ता मम पुष्पगन्धधूपाम्बुभोज्यादिनिवेदनेन ।
तथाग्निहोमेन च यान्ति तृप्तिं सदा पितृभ्यः प्रणतोsस्मि तेभ्यः ॥ २५ ॥
ये देवपूर्वाण्यभितृप्तिहेतोरश्नन्ति कव्यानि शुभाह्रतानि ।
तृप्ताश्र्च ये भूतिसृजो भवन्ति तृप्यन्तु तेsस्मिन् प्रणतोsस्मि तेभ्यः ॥ २६ ॥
रक्षांसि भूतान्यसुरांस्तथोग्रान् निर्णाशयन्तु त्वशिवं प्रजानाम् ।
आद्दाः सुराणाममरेशपूज्यास्तृप्यन्तु तेsस्मिन् प्रणतोsस्मि तेभ्यः ॥ २७ ॥
अग्निष्वात्ता बर्हिषद आज्यपाः सोमपास्तथा ।
व्रजन्तु तृप्तिं श्राद्धेsस्मिन्पितरस्तर्पिता मया ॥ २८ ॥
अग्निष्वात्ताः पितृगणाः प्राचीं रक्षन्तु मे दिशम् ।
तथा बर्हिषदः पान्तु याम्यां मे पितरः सदा ।
प्रतीचीमाज्यपास्तद्वदुदीचीमपि सोमपाः ॥ २९ ॥
रक्षोभूरपिशाचेभ्यस्तथैवासुरदोषतः ।
सर्वतः पितरो रक्षां कुर्वन्तु मम नित्यशः ॥ ३० ॥
विश्र्वो विश्र्वभुगाराध्यो धर्मो धन्यः शुभाननः ।
भूतिदो भूतिकृद भूतिः पितृणां ये गणा नव ॥ ३१ ॥
कल्याणः कल्यदः कर्ता कल्य कल्यतराश्रयः ।
कल्यताहेतुरनघःषडिमे ते गणाः स्मृताः ॥ ३२ ॥
वरो वरेण्यो वरदस्तुष्टिदः पुष्टिदस्तथा ।
विश्र्वपाता तथा धाता सप्तैते च गणाः स्मृताः ॥ ३३ ॥
महान्महात्मा महितो महिमावान्महाबलः ।
गणाः पञ्च तथैवैते पितृणां पापनाशनाः ॥ ३४ ॥
सुखदो धनदश्र्चान्यो धर्मदोsन्यश्र्च भूतिदः ।
पितृणां कथ्यते चैव तथा गणचतुष्टयम् ॥ ३५ ॥
एकत्रिंशत्पितृगणा यैर्व्याप्तमखिलं जगत् ।
त एवात्र पितृगणास्तुष्यन्तु च मदाहितात् ॥ ३६ ॥
॥ इति श्री गरुड पुराणे प्रजापति रुचिकृतं पितृ स्तुति संपूर्णा ॥
संकलन :- अशोककाका कुलकर्णी

