१९८१, अभंग :- कथा पुराण ऐकता । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडता । व्यापी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १९८१
कथा पुराण ऐकता । झोंपे नाडिले तत्त्वता । खाटेवरी पडता । व्यापी चिंता तळमळ ॥१॥
ऐसी गहन कर्मगति । काय तयासी रडती । जाले जाणते जे चित्ती । काही नेघे आपुल्या ॥धृपद॥
उदक लाविता न धरे । चिंता करी केंव्हा सरे । जाऊ नका धीरे । म्हणे करिता ढवाळ्या ॥२॥
जवळी गोचीड क्षीरा । जैसी कमळणी दर्दुरा । तुका म्हणे दूर । देश त्याग तयासी ॥३॥

अर्थ

कथा व पुराण ऐकताना झोप येते. मग खाटेवर पडलो झोप न येता विविध प्रकारची चिंता व्याप याविषयी तळमळ मनात येते. अशी ही प्रारब्धाची कर्मगती गहाण आहे, मग त्यापुढे संसारी माणसे काय रडतील? सर्व काही जाणत असलेले लोक सुद्धा चांगले विचार आपल्या चित्तात घेत नाहीत. कथा-पुराणे चालू असताना माणसे झोप आली की डोळ्याला पाणी लावतात परंतु झोप काही केल्या आवरत नाही तेव्हा ही कथा पुराण केव्हा संपेल या विषयी तो चिंता करत असतो. परंतु जर समजा दुसऱ्याच्या टवाळया चालू असतील आणि बैठकीत एखादा मनुष्य उठला तर त्याला तो म्हणतो थांबा जाऊ नका आत्ताच जाऊ नका. तुकाराम महाराज म्हणतात गोचिड स्तना जवळ राहते परंतु ते शुद्ध दुध न पिता अशुद्ध रक्त पिते तसेच बेडुक आणी कमळ एकाच ठिकाणी राहते परंतु बेडकाला कमळाचा सुगंध न आवडता चिखलाचा दुर्गंध च आवडतो. त्याप्रमाणे मूर्ख मनुष्य हरिकथा व पुराण चालु असताना ऐकत नाही ते जणू दूर देशांअंतरी भटकंती करत असतात.

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading