नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १९४५
आधी नाही कळो आला हा उपाय । नाही तरी काय चुकी होती ॥१॥
घालितो पायासी मिठी एकसरे । नेदी तो दुसरे आड येऊ ॥ध्रु॥
कासया पडितो लटिक्याचे भरी । नव्हता का शिरी भार घेतो ॥२॥
संसाराचा हाटक फिरतो दुकानी । भरोवरी धन मेळवीतो ॥३॥
तुका म्हणे का हे घेतो गर्भवास । का या होतो दास कुटुंबाचा ॥४॥
अर्थ
देवा मला तुझ्या प्राप्तीचा उपाय आधी समजलाच नाही नाहीतर तुझी प्राप्ती करून घेण्यात माझ्याकडून चूक झाली असती काय? देवा आता मी तुझ्या पायाला एकनिष्ठ भावनेने मिठी मारतो त्यामध्ये दुसरे काहीही आड येऊ देत नाही. देवा मला जर सुरुवातीलाच तुझ्या प्राप्तीचा उपाय माहित असता तर या खोट्या संसाराच्या भरीला मी कशाला पडलो असतो आणि या संसारातील स्त्रि पुत्र धन इष्टा आपतेष्टा सर्व नातेवाईक यांचा भार मी माझ्या माथ्यावर का घेतला असता? देवा संसाराच्या या बाजारांमध्ये मी अनेक देहरूपी दुकाने का फिरत बसलो असतो आणि नको ते धन का मिळवीत बसलो असतो ? तुकाराम महाराज म्हणतात देवा मला तुझ्या प्रातीचा उपाय समजला असता तर मी अनेक जन्ममरण रुपी गर्भवास का सोसला असता, का बरे या प्रपंचाचा दास झालो असतो?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
