नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १९४२
देहबुद्धी वसे जयाचिये अंगी । पूज्यता त्या जगी सुख मानी ॥१॥
थोर असे दगा जाला त्यासी हाटी । सोडोनिया गाठी चोरी नेली ॥धृपद॥
गाठीचे जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभे ॥२॥
पुढिल्या उदिमा जालेसे खंडण । दिसे नागवण पडे गाठी ॥३॥
तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनिया घात कोण करी ॥४॥
अर्थ
ज्याच्या अंगामध्ये देहबुद्धी आहे म्हणजे देहा विषयी आसक्ती आहे त्याला आपल्याला सर्वांनी पुज्य मानावे मग तेच खरे सुख आहे असे त्याला वाटते. या संसार बाजारांमध्ये त्याला फार मोठ्या प्रमाणाचा दगा झाला आहे असे समजावे कारण त्याच्या पदरामध्ये जे पुण्याचे धन होते ते केवळ या मान्यतेच्या सुखाने चोरून नेले असेच म्हणावे. पदरच्या पुण्याचे धन जाऊन तो मोकळा होतो असे नाही तर त्याचा गळा दंभ आणि लोभाणे बांधला जातो. असे झाल्यामुळे पुढे होणार्या परमार्थिक कर्माविषयी त्याचा खंड पडतो व त्यानंतर परमार्थही नाही व संसार ही नाही अशा प्रकारची फजिती त्याच्या पदरात पडलेले दिसते. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे मानापानाच्या बंधनात अडकू नये दंभ लोभाच्या बंधनात गुंतू नये असे संत नेहमी सांगतात आणि ज्याला संतांचे हे बोलणे समजले मग सर्व जाणून देखील स्वतःचा घात स्वतः कोण करून घेईल?
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
