नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८३९
तुजऐसा कोणी न देखे उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥१॥
शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागता त्यास अढळ देसी ॥धृपद॥
धावसी आडणी ऐकोनिया धावा । कइवारे देवा भक्तांचिया ॥२॥
दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाठी हरी आपुलिया ॥३॥
तुका म्हणे तुज वाणू कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडे ॥४॥
अर्थ
पांडुरंगा , अभय दान देण्यात तुझ्यासारखा उदार आणि शूर कोणीही पाहिला नाही. जे तुला शरण येतात तु त्यांच्या गुणदोषाचा विचार करीत नाहीस ;आणि काहीही न मागता सढळ हाताने त्यांना तू अढळपद देतोस. संकटप्रसंगी भक्तांचा धावा ऐकून , त्यांचा कैवार घेऊन धाव घेतोस. हे हरी , आपल्या नामाचे महत्व राखण्याच्या अभिमानाने कोट्यावधी कल्पपर्यंतही भोगून न संपणा-या भक्तांच्या पापाना जाळून टाकतोस. तुकाराम महाराज म्हणतात , हरी , तुझ्या अनंत गुणाचे वर्णन कसे बरे करू !कारण , मला एक मुख आहे ;आणि आयुष्य थोडे आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
