नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १८२०
आम्ही पतित म्हणोनि तुज आलो शरण । करितो चिंतन दिवस रात्री ।
नाही तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्ती ॥१॥
आम्हा न तारावे तुम्ही काय करावे । सांगीजोजी भावे नारायणा ॥धृपद॥
अन्याय कोणाचा अंगीकार करणे । तया हाती देणे लाज तेचि ।
काय ते शूरत्व मिरवूनि बोलणे । जनामाजी दावणे बळरया ॥२॥
पोह्या अन्नछत्र घालूनिया घरी । दंडितो बाहेरी आलियासी ।
नव्हे कीर्ती काही न मानेचि लोका । काय विटंबणा जैसी तैसी ॥३॥
प्रत्यक्षासी काय द्यावे गा प्रमाण । पाहाता दर्पण साक्ष काई ।
तुका म्हणे तरी आम्हा का न कळे । तरलो किंवा आम्ही नाही ॥४॥
अर्थ
देवा आम्ही पतित आहोत म्हणूनच तुला शरण आलो आहोत त्यामुळे आम्ही तुझे चिंतन रात्रंदिवस करीत आहोत. देवा जर आम्ही पतीत नसतो तर तुझी भिड आम्ही चित्तात का धरली असती? देवा हे नारायणा तुम्ही जर आमचा उद्धार करणार नाही तर मग तुम्ही आमचे काय करणार ते खरे सांगा. ज्याने आमचा अंगीकार करून दुसऱ्याच्या हाती आम्हाला दिले अशी ज्याची चूक आहे, त्याची ही लाजिरवाणी चूक त्यानेच स्वीकारावी. देवा अहो तुमची दीनानाथ , पतितपावन म्हणून ब्रिदे आहे, केवळ त्याचेच तुम्ही भूषण जगामध्ये मिरवता शुर व्यक्तीने केव्हा ही शुरत्वाच्या गप्पा मारू नये त्याचे भुषण मिरवून उगाच बरळु नये. घराबाहेर पाणपोया अन्नछत्र घालतो आणि बाहेर आलेल्या भुकेल्यांना तहानलेल्यांना परत हाकलूनही लावतो याला काय अर्थ आहे काय? जर असे त्याने केले तर त्याची कीर्ती जगामध्ये होणार नाहीये लोकांना तो पटायचा नाही आणि त्याने असे करणे म्हणजे ती एक प्रकारची विटंबना नाही काय? तुकाराम म
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
