नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १६५५
येथे बोलोनिया काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वाकडे । ये विठ्ठलकथेपुढे ॥धृपद॥
ऐकोनि मरसी वृथा । जव आहेसि तुं जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणे न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करी उपदेश ॥४॥
आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडू कळिकाळाचे शीर ॥५॥
घेऊ पुढती जन्म । वाणू कीर्ती मुखे नाम ॥६॥
तुका म्हणे मुक्ती । नाही आसचि ये चित्ती ॥७॥
अर्थ
महाराज हरिकथा करत असताना मध्येच येऊन त्यांना एका मनुष्याने विचारले महाराज मला ब्रम्हरस हवे आहे तेव्हा आपण मला उपदेश करावा आणि त्यावर महाराज त्याला म्हणतात, अरे हरिकथा चालू असताना असे मध्ये बोलणे हे चांगले आहे काय आणि तुला जर गुरु करायचा असेल तर येथे बसू नको चालता हो. अरे येथे विठ्ठल कथा चालू आहे आणि या कथेच्या पुढे वेडेवाकडे बोललेले मला सहन होणार नाही. अरे तू जोपर्यंत आहेस तोपर्यंत हरिकथा ऐक आणि ते तू करत नसशील तर तुझा जिवंत असूनही काहीच उपयोग नाही. ज्यांना आपल्या आब्रुतीची आवड आहे त्यांनी हरिकथा चालू असताना माझ्यापुढे असे वेडेवाकडे बडबड करू नये. जर मला कोणी ब्रम्हज्ञान विषयी काही विचारीत असेल तर मी त्याला असे उत्तर देईल की हरिकथा आवडीने ऐकताना हरिकथाच तुला ब्रम्ह ज्ञानाचा उपदेश करील. आम्ही विठ्ठलाचे शूरवीर भक्त आहोत. कळिकाळ देखील आमच्या पुढे आला तरी आम्ही त्याचे शिर फोडू. आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ आणि हरीचे गीत व कीर्ती गात राहू. तुकाराम महाराज म्हणतात मुक्तीची इच्छा देखील आमच्या चित्तात येत नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
