नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १५९४
स्मशानीच आम्हा न्याहालीचे सुख । या नावे कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाही तरी वाया अवघे निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥धृपद॥
झाडे झुडे जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मी केले ॥२॥
तुका म्हणे आता पाहे अनुभव । घेईन हाती जीव पांडुरंगा ॥३॥
अर्थ
देवा स्मशानामध्ये मला चितेवर जरी झोपवले तरी मला गादीवर झोपल्यासारखे वाटावे मग हेच कार्य कौतुक आणि हीच तुमची खरी कृपा आहे असे मी समजेन. नाहीतर केवळ देह तादात्मे सुटावे असे शब्द वापरणे म्हणजे केवळ पोकळ बडबड करणे हे व्यर्थ होय. ज्यावेळी सर्व झाडे झुडपे जीव पाषाण हे सोयरे होतील त्यावेळेस तुमचे माझ्यावर कृपादान झाले असे मला वाटेन. तुकाराम महाराज म्हणतात, “हे पांडुरंगा मी माझा जीव माझ्या हातात धरुन एवढीच वाट पाहात आहे की मला हा अनुभव केव्हा येईन.
”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
