कुळ वेद म्हणजे काय ? 96 कुळी मराठा 96 KULI MARATHA

KUL VED MHANJE KAY ?
कुळदैवत व कुळदेवी आणि कुलदेवता ह्या सर्व एकच असतात का वेगवेगळ्या ?
या साठी आपल्या कुळाचा कुळवृतांत ची फाईल बनवून घेणे.

कुळाचा वेद :> अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद. असे चार वेद मानवी कल्याणासाठी ईश्वराने निर्माण केले.

कुळ वेद म्हणजे काय ?
ईश्वराने आपल्या मायेने जेव्हा या ब्रह्मांडाची रचना केली व सृष्टीची निर्मिती केली.

या सृष्टीवर 84 लक्ष योनी अर्थात वेगवेगळे शरीर धरी प्राणी निर्माण केले, यामध्ये देवाला समजणारा, देवाला जाणणारा, त्याला ओळखणारा, असा एकच प्राणी तो म्हणजे मानव.

मानव जशी योनी आहे, अशाच अनेक प्रकारच्या योनी सुद्धा ईश्वराने निर्माण केल्या, त्यामध्येच देवी देवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, आदीकरून यामध्येच ब्रह्मदेवाची निर्मिती करून त्याला या सृष्टीचा कारभार करण्यासाठी जी नियमावली आहे, अर्थात आधुनिक काळामध्ये आपण त्याला “संविधान” म्हणूयात ती वेद रूपड दिली.

या वेदामध्ये कोणती गोष्ट
कशी करावी,
का करावी,
कशासाठी करावी,
करावी का करू नये,
केले तर काय होईल,
नाही केले तर काय होईल,
या सगळ्या प्रश्नांचे उत्तर ज्या वेदांमध्ये आहेत.

ते चार वेद असून त्या वेदाला मानणारे चार प्रकारचे वर्ण निर्माण झाले.

एकच वर्ण अनेक वेदांना सुद्धा मानताना दिसतात, तथा हे सगळे वेद सर्वांच्याच कल्याणाच्या दृष्टीने कार्य करत आहेत,

परंतु त्यामध्ये दंड विधान सुद्धा उपलब्ध आहे,
एखादा व्यक्ती जेव्हा या सृष्टीच्या नियमाच्या विरोधात जातो तेव्हा त्याला काहीतरी दंड दिले जातो, त्यासाठी पाप आणि पुण्य स्वर्ग आणि नर्क इत्यादी विषयी संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे.

तसेच वेदांमध्ये राज्यकारभार, कौटुंबिक उत्कर्ष, आध्यात्मिक उत्कर्ष, सामाजिक उत्कर्ष, कला, युद्ध, नीती, आचरण, याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केलेले आहे.

अशाच वेदाला मानणारा एक गट निर्माण झाला, आणि तोच गट पुढे 96 कुळी मराठी म्हणून जाणून जाऊ लागला, त्यापैकीच आपले एक कुळ आहे, जे यातील कोणत्याही एका वेदाला मानते.

संपूर्ण-माहिती-पहा

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading