११५९, अभंग :- का न वजावे बैसोनि कथे । ऐसे ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथे । उभा असे तिष्ठत :- संत तुकाराम सार्थ गाथा
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ११५९
का न वजावे बैसोनि कथे । ऐसे ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथे । उभा असे तिष्ठत ॥१॥
म्हणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणे ॥धृपद॥
कथे काही अणुमात्र । नो बोलावा हा वृत्तांत । देवभक्ता चित्त । समरसी खंडणा ॥२॥
का वैष्णव पूजावे । ऐका घेईल जो भावे । चरणरजा शिवे । वोढविला मस्तक ॥३॥
ऐसे जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवाचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठी ॥४॥
घालोनि लोळणी । तुका आला लोटांगणी । वंदी पायवणी । संतचरणींचे माथा ॥५॥
अर्थ
हे श्रोत्यांनो हरिकथा चालू असताना मधून का उठून जाऊ नये ते मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका. कथा चालू असताना स्वतः पांडुरंग तेथे कथा ऐकण्यासाठी तिष्ठत उभा असतो आणि आपण जर मधून उठलो तर त्या पांडुरंगाची अवज्ञा केल्यासारखा प्रकार होतो त्यामुळे कथेत बसण्याचा धीर धरावा आणि कथा भक्ती भावपूर्वक व लक्ष देऊन ऐकावी. ज्याला हा भवसागर तरुन जायचा असेल त्याने मी सांगितले तसे ऐकावे. कथा चालू असताना कोणत्याही गोष्टी अनुमात्र म्हणजे थोड्या देखील बोलू नये कारण तेथे देव आणि भक्त यांच्या चित्ताचा मिलाप झालेला असतो म्हणजे दोघेही एकरूप झालेले असतात आणि आपण जर मध्येच बोललो तर त्यात बिघाड होतो. वैष्णवांना का पुजावे श्रद्धेने ऐकायचे असेल तर ऐका. वैष्णवांच्या पायाची धूळ म्हणजे रजकण चरणरज आपल्या मस्तकाला लावता यावी म्हणून भगवान शंकर देखील आपले मस्तक पुढे करत असतात त्यामुळे वैष्णवांना पुजावे देव वैष्णवाचा अंकित आहे हे तुम्ही जाणून घ्या. तो देव या जगतामध्ये राहून देखील या जगापासून अलिप्त आहे विलक्षण आहे आणि असा देव वैष्णवा करिता सगुण-साकार झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाचा एवढा अनन्यसाधारण महिमा आहे , त्यामुळे मी वैष्णवांच्या चरणी लोळणी घालून त्यांच्या चरणावर लोटांगण घालत आहे वैष्णवांचे चरण धुवून, धुतलेल्या तीर्थ ला मी माझ्या मस्तकाला, माथ्याला लावतो.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
