👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ३३
निळिये पेरणी निळियेपणी खाणीं । गुणाची लेणी कृष्णवर्ण ॥ नवलाव गे माय नवल चोज । निळीं निळिमा काज आकारलें ॥ नीळवर्ण तनु नीळवर्ण गुणू । निळी निळिमा पूर्ण हृदयी नांदे ॥ ज्ञानदेवीं लीला मन मनी निवाला । निळिये अवलीला हरपला ॥
अर्थ:-
त्या हृदयात निळेपणाचा परमात्मरुपी बीज घातल्यावर निळवर्णाची खाणच मिळाली. त्या निलवर्णाने सर्व गुण निळेच झाले आहेत. आश्चर्य आहे की माया ही निळीच आहे. व सर्व जगच निळे दिसत आहे. त्याचे शरिर निळे त्याचे गुण निळे संपुर्ण हृदयी निळेपणे आले आहे. त्याच्या निळवर्ण लीलेने मन उन्मन झाले व मी त्यात लीन झालो. असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 32
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 34

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ३२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ३३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]