नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. १९७५
परमअमृते रसना ओलावली । मनाची राहिली वृत्ति पायी ॥१॥
सकळ ही तेथे वोळली मंगळे । वृष्टी केली जळे आनंदाच्या ॥धृपद॥
सकळ इंद्रिये जाली ब्रम्हरूप । ओतले स्वरूप माजी तया ॥२॥
तुका म्हणे जेथे वसे भक्तराव । तेथे नांदे देव संदेह नाही ॥३॥
अर्थ
अर्थ –हरीच्या नामस्मरणाने, नामातून होणाऱ्या प्रेम रुपी अमृताने माझी जिव्हा ओलावली आहे, त्या अमृतात न्हाऊन निघत आहे व माझ्या मनासकट सर्व इंद्रियांची वृत्ती देखील नारायणाच्या पायाशी वळून तेथे एकवटून राहिली आहे. त्यामुळे सगळी मंगलदायके देखील तेथे वळली असून अशा ठिकाणी आनंदरूपी जलाच्या सतत वृष्टी होत असते. (म्हणजेच असा योग जुळून आल्याने आनंदाला उधाण येऊन सर्वत्र मंगल आणि प्रसन्न वाटते आहे. ) तसेच नामाच्या चिंतनाने सगळी इंद्रिये देखील ब्रम्हरूप झाली असून ती आत्मस्वरूप होऊन गेली आहेत, म्हणजेच स्वतःची वेगळी अशी ओळख विसरून ते आत्मस्वरूपात विलीन झाली आहेत. तुकाराम महाराज म्हणतात असा हा भक्तराव, म्हणजेच भक्तांचा राजा जेथे वास करतो श्रीहरी नारायण देखील तेथेच नांदतो आणि ह्यात किंचित देखील दुमत किंवा संदेह नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
