ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र .366

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ३६६

शून्य हे चार महाशून्य दिसतसे । निजरंग वसे सर्व त्यांत ॥१॥ ऐसा रंग जया लाधतांचि पाही । मनाची ही सोई हारपली ॥२॥ ज्ञानदेवाचा बोल बोलण्यांचे रूप । निवृत्तिस्वरूप सर्वत्र हें ॥३॥

अर्थ:-

योगाभ्यासी पुरूष ज्या तेजोमय नील बिंदुकडे पाहतात ते शून्य चार भागांत विभागलेले असून त्यातील सर्वांच्या आतील भाग तो महाशून्यच होय. व त्यातच ब्रह्मतत्त्व साठवलेले आहे. अशी ज्याची दष्टी झाली. त्याच्या मनाचा मनपणा नाहिसा होतो. आमचे बोलणे शब्दरुप जरी दिसले तरी ते सर्व निवृत्तीस्वरुपच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply