नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. २०३५
अडचणीचे दार । बाहेर माजी पैस फार ॥१॥
काय करावे ते मौन । दाही दिशा हिंडे मन ॥धृपद॥
बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥२॥
नाही इंद्रिया दमन । काय मांडिला दुकान ॥३॥
अर्थ
एका व्यक्तीने खूप मोठे घर बांधले आत मधे खुप जागा बाहेरही खूप मोठे पटांगण आहे परंतु घरात जाण्यासाठी जे दार आहे ते खूप अडचणीचे केले की ज्यातून आतही जाता येत नाही मग त्या घराचा काय उपयोग आहे काय? त्याप्रमाणे ज्याचे मन दाही दिशा फिरत असते त्याने कितीही मौन धरले तरी त्याचा काही उपयोग आसतो? बाहेर साधुसंत असल्याचा वेश धारण करून सोंग आणतो आणि आतमध्ये मात्र वासनेचा जर लेश असेल तर त्या वेश्याचा काही उपयोग आहे काय? इंद्रियांचे दमन तु करू शकत नाही इंद्रियांना तु आपल्या संयमात ठेऊ शकत नाही तर मग ते परमार्थाचे दुकान काय मांडले आहेस? आहो बाहेरून भिंतीला चांगले वरवर सारवले परंतु आत मध्ये घरात घाणच असेल तर काही उपयोग आहे का त्याप्रमाणे तुम्ही साधूचे वरवर वेश धारण करून सोंग घेतले खरे परंतु आत मध्ये जर तुमचे मन अपवित्र असेल तर त्याचा काही उपयोग होतो काय? तुकाराम महाराज म्हणतात अशा सोंगी मनुष्याच्या शेवटी हाताला काहीच लागत नाही.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
