ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 48

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४८

मूळ ना डाळ शाखा ना पल्लव । तो हा कैसा देव आम्हां घरी ॥ निर्गुणपणें उभा सगुणपणे शोभा । जिवीं शिवीं प्रभा दाविता हे ॥ नकळे याची गति न कळे याची लीळा । आपि आप सोहळा भोगीतसे ॥ ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी । आपण चराचरी नांदतसे ॥

अर्थ:-
ज्याला मूळ नाही फांद्या व पान नाहीत असा वृक्षस्वरुप देव आमच्या घरी आहे. तो निर्गुणपणात उभा राहुन सगुणपणे शोभा दाखवतो व त्याची प्रभा जीव शिवावर पसरली आहे. त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत तरी तो सगळे सोहळे भोगतो आहे. माऊली ज्ञानेश्वर बोलतात त्याची थोरवी कळत नाही तरी तो आपण होऊन सर्व चराचरात नांदत आहे.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading