१८०४, अभंग :- सिणलो दातारा करिता वेरझारा । आता सोडवी:- संत तुकाराम सार्थ गाथा

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग

अभंग क्र. १८०४
सिणलो दातारा करिता वेरझारा । आता सोडवी संसारापासोनिया ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसे खोडा हाडांचिया ॥धृपद॥
मायबापे माझी जीवाची सांगाती । ती देतील हाती काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारी । यमफासा करी घेऊनिया ॥३॥
पाठी पोटी एके लागली सरसी । नेती नरकापाशी ओढूनिया ॥४॥
जन साह्यभूत असे या सकळा । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाही कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥

अर्थ

हे दातारा मी या जन्ममरणाच्या येरझारा करुन करुन फार शीणलो आहे आता मला तू या संसारापासून सोडव. माझ्या पूर्वच्या संचित कर्माचा झाडा पाडा काही होत नाही त्याची बाकीच राहते त्यामुळे माझ्या या देहाच्या हाडाला जन्ममरणाचा खोडा घातला आहे. माझे मायबाप हे माझ्या या जन्मीच्या जीवाचे सांगाती आहेत ते देखील मला काळाच्या हाती देतील. यम सुरी पाजळून आणि काळाचा फासा हातात घेऊन माझ्या शेजारीच बसला आहे. यम माझ्या शेजारीच बसला असल्यामुळे त्याने हातात घेतलेली सुरी माझ्या पाठीपोटी लागली आहे व त्याने घेतलेला काळाचा फासा मला ओढून मला नरकाकडे नेत आहे. आणि या सर्व गोष्टीला हे सर्व लोक देखील साहाय्य होत आहेत आणि या सर्वांमध्ये मीच एकटा निराळा परदेशी आहे येथे मी तरी काय करणार आहे ? हे हरी कृपाळूवा तुझ्यावाचून इतर कोणीही मला काकूळतीला येणार नाही. कोणीही माझ्यावर दया करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा मला तुझ्यावाचून कोणावरही भरवसा नाही त्यामुळेच मी सर्व लोकांवरची आशाच सोडून देतोय. ”

नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची

वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.

WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा २०१ ते ३००

संत तुकाराम म. सार्थ अभंग गाथा १०१ ते २००

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading