ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.422

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२२

नयनांतील रूप जो हें देखे पुरूष । त्याचे चरणीं वास असे माझा ॥१॥ नयनांतील ज्योती देखे गुह्यभावें । त्याचे स्वरूप भावें वंदावे गा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे नयनांतील शून्य । देखे तोचि धन्य भाग्यवंत ॥३॥

अर्थ:-

जो पुरूष ध्यान योगाने डोळ्यातील हे तेज पाहातो.त्याच्या चरणावर माझा वास असो. डोळ्यातील दिव्य ज्योतीचे दर्शन जो या गह्य मार्गाने घेतो. त्यालाच वंदन करावे. ज्या पुरूषाला डोळ्या तील हे तेज प्राप्त झाले तो धन्य व भाग्यवान म्हणावा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply