सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २२६ ते २५० पहा.
226-15तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा । तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या ॥226॥त्याप्रमाणे अर्जुना, जोपर्यंत विचाराने डोके वर काढले नाही तोपर्यंत या संसाररूपी वृक्षाला अंत नाही.227-15वाजतें वारें निवांत। जंव न राहे जेथिंचें तेथ। तंव तरंगतां अनंत। म्हणावीचि…
