सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ४७६ ते ५०० पहा.
476-15तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु । इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे ॥ 476 ॥त्यांतील पहिल्याचे नांव क्षर; व दुसऱ्याचे नांव अक्षर. या दोघांनीच हे संसारनगर व्यापून टाकले आहे. 76477-15आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो…
