जोगी, बाळछंद, वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
मुख्य सूची संपूर्ण भजनी मालिका
मंगलाचरण पहिले
मंगलाचरण दुसरे
मंगलाचरण तिसरे
मंगलाचरण चवथे
मंगलाचरण पांचवे
काकड आरती अभंग
भुपाळ्या अभंग
वासुदेव अभंग
आंधळे अभंग
पांगळे अभंग
जोगी अभंग
दळण अभंग
मुका अभंग
बहिरा अभंग
जागल्या अभंग
जाते अभंग
मदालसा अभंग
बाळछंद अभंग
गौळणी व्हिडिओ
गौळणी अभंग
आरती संग्रह
पसायदान

1 जग जोगी जग जोगी

जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥१॥
जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥
अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥२॥
पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥३॥
बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥४॥
नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥५॥
तुका मागे दान । द्यावे जी अनन्य ॥६॥ ॥

बाळछंद प्रारंभ

बाळछंद १

1 बाळछंदो प्रेमडोहीं मन ७२६

बाळछंदो प्रेमडोहीं मन । जालें मनाचें उन्मन ।
उपरती धरिलें ध्यान । झालें ज्ञानपरब्रह्मीं ॥१॥
निमिषा निमिष छंद माझा । बाळछंदो हा तुझा ।
वेगि येई गरुडध्वजा । पसरुनीया भूजा देई क्षेम ॥२॥
तुटली आशेची सांगडी । ध्यानें नेली पैल तडी ।
सुटली संसाराची बेडी । क्षणु घडी रिती नाहीं ॥३॥
नाठवें द्वैताची भावना । अद्वैती न बैसें ध्याना ।
दिननिशींची रचना । काळगणना छंदे गिळीं ॥४॥
जप तप वृत्ति सहित । निवृत्ति होईन निश्चिति ।
समाधी बैसेन एकतत्त्व । मुखीं मात नामाची ॥५॥
ज्ञानदेवीं छंद ऐसा । बाळछंद झाला पिसा ।
दान मागतसे महेशा । दिशादिशा न घली मन ॥६॥

बाळछंद २

२ अलक्षलक्षीं मी लक्षीं ७२७

अलक्षलक्षीं मी लक्षीं । तेथें दिसती दोहीं पक्षी ।
वेदां शास्त्रां हे़ची साक्षी । चंद्रसूर्या सहित ।
मागेन स्वानुभवअंगुले । पांचा तत्त्वांचे सानुलें ।
व्यर्थ इंद्रिये भोगीलें । नाहीं रंगले संताचरणीं ॥१॥

बाळछंदो बाबा बाळ छंदो । रामकृष्ण नित्य उदो ।
ह्रदयकळिके भावभेदो । वृत्तिसहित शरीर निंदो ।
नित्य उदो तुझाची ॥२॥

क्षीरसिंधुही दुहिला । चतुर्दशरत्नीं भरला ।
नेघे तेथील साउला । मज अबोला प्रपंचेंसी ।
दानदेगा उदारश्रेष्ठा । परब्रह्म तूं वैकुंठा ।
मुक्ति मार्गीचा चोहटा । फुकटा नेघे तया ॥३॥

पृथ्वीतळ राज्यमद । मी नेघे नेणें हेंही पद ।
रामकृष्ण वाचे गोविंद । हाची छंद तुझ्या पंथे ।
मंत्र तीर्थयज्ञयाग । या न करि भागा भाग ।
तूंचि होऊनि सर्वांग । सर्वासंग मज देई ॥४॥

वृत्ति सहित मज लपवी । माझें मन चरणीं ठेवी ।
निवृत्ति पदोंपदीं गोवीं तुं गोसावी दीनोध्दारण ॥
सात पांच तीन मेळा । या नेघे तत्त्वांचा सोहळा ।
रज तमाचा कंटाळा । ह्रदयीं जिव्हाळा हरि वसो ॥५

श्वेत पीत नेघे वस्त्र । ज्ञानविज्ञान नेघे शास्त्र ।
स्वर्ग मृत्यु पाताळपात्र । नित्य वस्त्र हरी देई ।
चंद्रसूर्य महेन्द्र पदें । ध्रुवादिकांची आनंदें ।
तें मी नेघे गा आल्हादें । तुझ्या ब्रिदें करीन घोष ॥६॥

करचरणेंसे इंद्रियवृत्ति । तुझ्या ठायीं तूंचि होती ।
मी माझी उरो नेदी कीर्ति । हें दान श्रीपति मज द्यावें ।
शांती दया क्षमा ऋध्दी । हेहि पाहातां मज उपाधी ।
तुझी या नामांची समाधी  कृपानिधी मज द्यावी ॥७॥

बापरखुमादेविवरु तुष्टला । दान घे घे म्हणोनि वोळला ।
अजानवृक्ष पाल्हाईला । मग बोलिला विठ्ठल हरी ।
पुंडलिके केलेरे कोडें । तें तुवां मागीतलेरे निवाडें ।
मीं तुज ह्रदयीं सांपडे । हे त्त्वां केलें ज्ञानदेवा ॥८॥



बाळछंद समाप्त

हेही वाचा

संपूर्ण काकडा भजन १३५ अभंग गौळणी सहित

संपूर्ण वारकरी भजनी मालिका

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading