सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ११५१ ते ११७० पहा.
1151-13तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा । पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी ॥1151॥महाराज, तसे श्रीकृष्णास झाले. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी (श्रवण उत्सुकता पाहून त्यानांही सांगण्याला चौपटीपेक्षा जास्त जोर आला.1152-13सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्र सिंधु भरे…
