सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २७६ ते ३०० पहा.
276-9जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसीं । जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥276॥ज्या ॐकाराच्या पोटी अ, उ व म् अशी अक्षरे उत्पन्न होतात, व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले,277-9म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।…
