सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १ ते २५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ षोडशोऽध्यायः अध्याय सोळावा ॥ दैवासुरसंपविभागयोग ॥
अध्याय सोळावा
ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ षोडशोशोऽध्यायः – अध्याय सोळावा । । । दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।

1-16
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु । अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥ 16a1 ॥
महाराज, अध्यायाच्या आरंभी श्रीसद्गुरूचे बोधरूपी सूर्याची उपमा देऊन नमन करितात ते असे. ज्या सूर्याच्या उदयानी, अद्वयकमलिनी विकास पाऊन प्रकट असलेले विश्वदर्शन मावळन जाते, असा विलक्षण प्रकार बडतो; त्या ज्ञानरूप सूर्यास नमस्कार असो. 1
2-16
जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया । जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥16a2 ॥
ज्याच्या उदयाने अविद्यारूप रात्र संपून ज्ञानाज्ञानरूपाने त्या रात्रींत चमकणाऱ्या चांदिण्या रात्री बरोबर निस्तेज होतात व जो उदय म्हणजे ज्ञानीजनांना आत्मबोधाचा मंगल दिन होय. 2
3-16
जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे । सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी ॥16a3 ॥
ज्याच्या प्रभातकाळीं जीवरूप पक्षांचे आत्मज्ञाननेत्र प्रकाशित होऊन ते देहात्मबुद्धिचीं घरटी सोडून बाहेर पडतात. 3
4-16
लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा । बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय ॥ 16a4 ॥
ज्याच्या उदयानं लिंगदेहरूप कमलाच्या विकासाने त्यात गुंतून पडलेला जीवचैतन्यरूप भ्रमर मुक्त होतो. 4
5-16
शब्दाचिया आसकडीं । भेद नदीच्या दोहीं थडीं । आरडाते विरहवेडीं । बुद्धिबोधु ॥16a5 ॥
शास्त्रांतील विरूद्ध वचनांची एकवाक्यता न झाल्यामुळे,अज्ञानरूप अंधकाराचे साम्राज्य पसरून, भेदसत्यत्व निश्चय होऊन, तीच कोणी एक नदी तिच्या दोन तीरांवर त्या अज्ञान रात्रीमुळे बुद्धिरूप (मादी) व बोधरूप (नर) चक्रवाक पक्षांची तटातूट होऊन (बुद्धीला परमात्मज्ञान न होऊन) ते जोडपे विरहदुःखाने ओरडत बसले आहे. 5

6-16
तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान । भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा ॥ 16a6 ॥
चिदाकाशामध्ये ब्रह्मांडाला प्रकाशित करणाऱ्या ज्ञानरूप सूर्याचा उदय होऊन ते विरही चक्रवाक जोडपें (जीव व परमात्मा) ह्यांचे ऐक्य होऊन समाधान. 6
7-16
जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरवेळ फिटे । रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी ॥ 16.7 ॥
ज्या ज्ञानभानूच्या उदयाच्या किंचित् पूर्वीच (पहाटें) भेदरूपो चोर मागल्या पायाने जातात, व योगी जनरुपी पांथस्थ आत्मानुभवाची वाट आक्रमण करतात. 7
8-16
जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे । दीपले जाळिती दांगें । संसाराचीं ॥16a8 ॥
ज्या ज्ञानसूर्याच्या विचाररूप किरणांच्या योगे वृत्तिज्ञानरूप सूर्यकांतमणि प्रदीप्त होऊन संसाररूपीं वने जाळून टाकितो. 8
9-16
जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरीं स्थिरु । ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ तें ॥16a9 ॥
ज्याचा तीव्र किरणसमूहप्रकाश जीवररूपी अज्ञानाच्या माळजमिनीवर स्थिर असतांना विश्वरूपी महासिद्धींचा पूर येतो. 9
10-16
जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया । लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं ॥16 a10 ॥
जो सूर्य “प्रत्यगात्मबोधरूप ” सोऽहं’ भावाच्या माध्यान्हकाली माथ्यावर आला असतां, आत्मस्वरूपविषयक भ्रांतिरूप छाया पायातळी येऊन नाहीशी होते. 10

11-16
ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें । सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती ॥ 16a11 ॥
ज्याच्या उदयाने मूळमायारात्रीचाच नाश होतो, तेथे विपरीत विश्वादि स्वप्नदर्शनाची जननी जी अज्ञाननिद्रा तिचा कसा पत्ता असणार? 11
12-16
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी । मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागती ॥ 16a12 ॥
मग अद्वयबोधरूपी नगरांत सगळीकडेच महानंदाची गर्दी उसळून, त्यामुळे सुखानुभवाची देवघेवही मंदावू लागते. 12
13-16
किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें । सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि ॥ 16a13 ॥
किंबहुना, ज्या ज्ञानसूर्याच्या तेजाला मुक्ति किंवा कैवल्य ह्या मंगल दिवसाशिवाय अन्य वेळच माहीत नाहीं 13
14-16
जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो । फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा ॥16a14 ॥
जो बोध सूर्य आत्मस्वरूपाकाशाचा राजा असून नित्य उदितच आहे; तरीही, अज्ञानप्रतिबंध दूर होऊन पुन्हा उदित झाल्यासारखा वाटतांच, पूर्वपश्चिमादि सर्व दिशा एकरूप करून उदय व अस्त ह्याचे नांवही उरू देत नाही. 14
15-16
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी । काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी ॥16a15 ॥
समजणे व न समजणे हे ज्ञानाज्ञानाचे दोन्ही व्यवहार ज्या स्वरूपज्ञानाच्या टेक्यावर चालतात, ते यथार्थत्वाने प्रकट झाले असता त्या उषःकालाची कांहीं अलौकिकच थोरवी आहे ती बोलून कशी वर्णन करवेल? 15

16-16
तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु । जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा ॥16a16 ॥
रात्र व दिवस अशा लौकिक भेदाला अवसर नसून त्याच्याही पलीकडला असा तो ज्ञानसूर्य तो कोणाच्या ज्ञानाचा होणार? ज्याच्या स्वरूपप्रकाशपुढे प्रकाश्य असा अन्यपदार्थच नाही असा तो केवळ प्रकाशरूप आहे. 16
17-16
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती । जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया ॥ 16a 7 ॥
असे चैतन्यसूर्य जे श्रीनिवृत्तिनाथ महाराज, त्यांना माझे वारंवार नमन असो; त्या अवाङ्मनमनसगोचरस्वरूपाची स्तुति करणे म्हणजे ही त्याला शब्दाची बाधा अगर विटाळ करू पहाणे होय. 17
18-16
देवाचें महिमान पाहोनियां । स्तुति तरी येइजे चांगावया । जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाईजे कां ॥16a 18 ॥
श्रीगुरूंच्या महात्म्यांच्या दृष्टीने विचार केला असतां जर स्तवन करणारा स्तव्यबुद्धी सह लयाला जाईल (स्तवन करणारा अद्वैत-भूमिकेवर येईल) तेव्हांच श्रीगुरूची खरी किंवा आवडणारी स्तुति होते. 18
19-16
जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे । कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो ॥16a19 ॥
जो सर्व लयाचाही साक्षी किंवा प्रकाशक आहे. त्याच्या स्वरूपवर्णनाविषयीं मौन धारण करणे हीच त्याची खरी स्तुति होय, व अशेषविशेष भाव लयास जाऊन सहज स्थितीत असणे हीच ज्याची प्राप्ती होय. 19
20-16
तया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं । सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे ॥16a20 ॥
त्या तुमच्या स्वरूपाची स्तुति करू पहाणारी वैखरीवाणी,पश्यंती व मध्यमावाणींच्या पोटांत प्रवेश करून अखेर परावाणी सह लय पावते.20

21-16
तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें । हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा ॥ 21 ॥
हे अद्वयानंद गुरुमूर्ते, अशा आपल्या स्वरूपाचे, सेवकभावाने मी केलेले स्तुतिस्तोत्र रूप भूषण आपण स्वीकारावें असे म्हणणंही वस्तुतः न शोभणारे आहे. 21
22-16
परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु । मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया ॥ 22 ॥
एकाद्या दरिद्रयानें, अमृतसिंधु पाहुण आलेला पाहून, आपण काय करीत आहों त्याच्या औचित्याचे भान न राहून जसा त्याला भाजीपाल्यांचा पाहुणचार केला असता. 22
23-16
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा । उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी ॥ 23 ॥
त्याच्या आनंदाचा वेग पाहून तो शाकपाहुणचारही मोठा म्हणावा लागतो, किंवा सूर्याला निरांजनाने ओवाळिलें असतां प्रत्यक्ष कृतीकडे दुर्लक्ष करून कर्त्याचा भावच जसा लक्षात घेणे योग्य होय. 23
24-16
बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे? । परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे ॥ 24 ॥
बालवयांत उचित अनुचित कळू लागले तर मग बालपण ते काय! म्हणून त्याच्या कोणत्याही गोष्टीचे माता कौतुक मानून संतोष पावते. 24
25-16
हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें । तें गंगा काय म्हणितलें । परतें सर? ॥ 25 ॥
अहो; गांवचा ओढा गावांतील घाणीसह गंगेत प्रवेश करू लागला असता तू मागे फिर असें कां गंगा त्याला म्हणेल? 25

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading