Category सार्थ-ग्रंथ

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १२६ ते १५० पहा.

126-2या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥126॥या विश्वामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे.(असे गुप्त रुपाने असलेले चैतन्य जे) तत्व जाणणारे (तत्वज्ञानी) संत ते ओळखून त्याचेच ग्रहण करतात.127-2सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १०१ ते १२५ पहा.

101-2परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥101॥या अज्ञानामुळे (मोहाने, मूर्खपणामुळे) तुला या गोष्टी समजत नाहीत. ज्याची चिंता करू नये, त्या गोष्टींची चिंता करत आहेस, मनात आणू नये ते तू आणतो आहेस;…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी ७६ ते १०० पहा.

76-2(दुसरे उदाहरणं देऊन माऊली सांगत आहेत)तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥76॥किंवा कडक उन्हाळ्यात (तीव्र उन्हामुळे जंगलात लागलेली आग) मोठा पर्वत वणव्याने व्यापला जावा. तसा तो धूनर्धारी अर्जून दुःखाने अगदी जर्जर (पिडीत)…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ५१ ते ७५ पहा.

51-2हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना ॥51॥(आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत), हे लक्षात आल्यावर अर्जुन मनात गोंधळला (,घाबरला). मग पुनः बोलू लागला. तो म्हणाला, देवा ! माझ्या या…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी २६ ते ५० पहा.

26-2तरी आतां काय जाहलें । कायि स्‍नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥26॥तर मग आताच (यांक्षणी) असे काय झाले, हा मोह कोठून उत्पन्न झाला, (हे मला काहीं कळत नाही) परंतू हे अर्जुना !! हे तू…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ दुसरा ओवी १ ते २५ पहा.

अध्याय दुसरासंजय उवाच :तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।विषीदन्तमिदं वाक्यमुव मधुसूदनः॥2.1॥भावार्थ :- संजय म्हणाला, करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले.॥1॥1-2मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥1॥(अर्जुनाची…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा संपूर्ण

सार्थ-ज्ञानेश्वरी-अध्याय २ ला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी १ ते २५ पहा.सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी २६ ते ५० पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ५१ ते ७५ पहा. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय २ रा ओवी ७६…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २५१ ते २७५ पहा.

251-1जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥251॥ज्याप्रमाणे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणे महापापें (अशा) कुळात सर्व बाजूनी प्रवेश करतात. ॥251॥252-1सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः॥1.42॥भावार्थ :-…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २२६ ते २५० पहा.

226-1त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥226॥त्रैलोक्याचे / त्रिभूवनाचे राज्य जरी मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. ॥226॥227-1जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे? । सांगे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १ ला ओवी २०१ ते २२५ पहा.

201-1जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥201॥भुंगा हा ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रकारचे कोरडे लाकूड सहज लीलेने पोखरून टाकतो, परंतु कोवळ्या कळीमध्येंच अडकून पडतो. ॥201॥202-1तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें…