Privacy Policy

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇

Privacy Policy

96 कुळी मराठा वेबसाईट व अॅप/सॉफ्टवेअर वापरण्याचे नियम.

  1. महत्वाची सुचना { ह्या वेबसाईटवर दिली जाणारी माहिती फक्त 96 कुळी मराठा समाजालाच लागू होते. }
    तेंव्हा या वेबसाईटवरून दिली जाणारी  माहिती,
    विवाह/लग्न, मंगलकार्य, वास्तुशांती, जावळ, धार्मिक पूजा, वास्तुशांती पूजा, बोअर/विहीर उद्यापन, व्रत उद्यापन, तीर्थयात्रा, संकल्प पूजा, कुलदेवता/देवी पूजा, इत्यादी वेळी लागणारी,

    गोत्र, देवक, कुळ मंत्र, इत्यादी 96 कुळी मराठा सोडून ईतर कोणत्याही जातीला म्हणजे त्या जातीतील व्यक्तीला वरीलप्रमाणे कार्य/पूजा इत्यादी करण्यासाठी ह्वे याबसाईटवरील माहिती लागू पडत नाही, ह्याची लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

  2. ईतर धर्म/धर्मातील लोक, जाती/जातीतील व्यक्ती ह्या याबसाईटवरील माहिती, संदर्भ म्हणून फक्त अभ्यास म्हणून किंवा फक्त माहितीसाठी म्हणून घेऊ शकतात.

    मात्र हि माहिती विवाह/लग्न, मंगलकार्य, वास्तुशांती, जावळ, धार्मिक पूजा, वास्तुशांती पूजा, बोअर/विहीर उद्यापन, व्रत उद्यापन, तीर्थयात्रा, संकल्प पूजा, कुलदेवता/देवी पूजा, इत्यादी वेळी लागणारी गोत्र, देवक, कुळ मंत्र, इत्यादी त्याना लागू होत नाही.

    तेंव्हा वरीलप्रमाणे पूजा इत्यादी केल्यास झालेल्या कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, आर्थिक, वेळ, लौकिक, पारलौकिक हानीस किंवा  नुकसान यास आम्ही जबाबदार नाही. 
  3. आमच्या maratha96kuli वेबसाईटवर आणि अॅप /सॉफ्टवेअर मध्ये दिली जाणारी माहिती हि जुन्या ग्रंथातून (पुस्तक) आणि वेगवेगळ्या माध्यमातून (जसे. इन्टरनेट, whatsaap, फेसबुक, अनेकांशी केलेली चर्चा, इत्यादी ) मिळवून त्याचे वर्गीकरण करून त्याचे आमच्या वेबसाईटवर आणि अॅप/सॉफ्टवेअर मध्ये प्रकाशन केलेले आहे.

  4. आमच्या वेबसाईटवर आणि अॅप/सॉफ्टवेअर मध्ये दिली जाणारी माहिती १००% टक्के खरीच आहे असा आमचा कोणताही दावा नाही.
    कारण
    हि माहिती शेकडो वर्षापासून अनेक माध्यमातून वेगवेगळ्या कालखंडातून आणि अनेक पुरुषांच्या (व्यक्तींच्या) माध्यमातून समोर जात असते, आणि हे घडत असतांना त्या त्या काळानुसार, व्यक्तीनुसार, कालखंडानुसार, बोलीभाषेनुसार, काही बदल घडत असतात. काही अपभ्रंश, तयार होतात, काही उच्चार बदलतात, काही कुळांचे देवक, बदलतात. असे अनेक बदल होत होत हि माहिती पुढे सरकत जात असते, आणि अशी अनेक वेगवेगळ्या बदलातून आलेली माहिती आमच्याकडे आणि अनेकांकडे उपलब्ध असते.

  5. अशी अनेक बदल झालेली माहिती आम्ही (ज्यात आम्ही कोणताही बदल केलेला नाही, फक्त त्या वेगवेळ्या माहितीचे संकलन केलेले आहे.) संकलित करून ती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही करतो.

  6. आमच्या वेबसाईट/अॅप/सॉफ्टवेअर मध्ये दिलेल्या माहितीमुळे कुणाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिल्या जाणार नाही. (कारण आम्ही कोणतीही माहिती चुकीची देत नाही, तुम्ही दिलेल्या मूळ माहितीचा उपलब्ध असलेला तपशिलाच फक्त आम्ही पुरवितो. जर माहिती मागवणार व्यक्तीच जर चुकीची माहिती देईल तर त्याला चुकीचीच (जी मागवनाऱ्या व्यक्तीसाठी फायद्याची नसेल.) माहितीच मिळेल.)

  7. टीप: हि माहिती इनपुट ते आऊटपुट या नियमाने चालते.
  8. आमच्या वेबसाईट/अॅप/सॉफ्टवेअर मध्ये दिलेल्या माहिती संदर्भात कोणत्याही प्रकारचे वाद विवाद उभे राहिल्यास न्यायालीन क्षेत्र रिसोड ता. रिसोड जिल्हा वाशिम हेच असेल.
  9. आपण माहिती मागवल्यानंतर पेमेंट झाल्यापासून नंतर दोन दिवस हे आपली माहिती शोधून, टाईप करून, तपासून देण्यासाठी लागतात. (टीप: रोगराई, नैसर्गिक संकट, अपघात, कोणतेही सुखदुःखाचे प्रसंग, आमचे वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम, इत्यादी) असल्यास वेळ अधिक दिवस लागू शकतो. याबद्दल कोणताही वाद/तक्रार करता येणार नाही.

  10. हि माहिती रुपये ५०००/ पांच हजार भरून दिली जाते. कारण हि माहिती जुन्या अनेक ग्रंथातून शोधणे, ती वेगवेगळ्या ग्रंथातील माहितीशी पडताळून पाहणे, नंतर ती टाईप करणाऱ्या कडून टाईप करून घेणे, आणि ती परत तपासून पाहणे, पुन्हा दुरुस्ती करून मग आपणास पाठविणे यासाठी अनेक प्रकारे मनुष्यबळ, वेळ, यंत्रणा संगणक, इत्यादी साठी खर्च नाही म्हटलं तरी होतो,
    दुसरे असे की आमचे कार्यालय शोधणे, तेथे जाणे, हा अतिशय वेळ खावूपणा होईल जो कुणालाही परवडणारा नाही.

    उदा: मुंबईतील, व्यक्तीला जर आमच्या कार्यालालाया भेट देऊन माहिती घ्यायची असेल तर ते किती महाग जाते बघू. मुंबई ते वाशिम ५८१ किलोमीटर आहे, जाणे येणे ११६२ किलोमीटर होते. १० प्रती किलोमीटर प्रमाणे ११६२०/ रुपये +ड्रायव्हर भत्ता ८००रुपये, +ईतर खर्च १००० हजार, दोन दिवस जाणे येणे. एकूण खर्च + १३४२०/ रुपये होतात.
    ऑनलाईन फक्त रुपये ५०००/ आणि कोणतीही जोखीम (रिस्क) नाही.

    आपला मराठा समाज फार दूर दूर आहे. बलुचिस्थान मध्ये पानिपतच्या युद्धात बंदी म्हणून नेलेले मराठा, त्यांचे वंशज आजही तेथे आहेत, आनंदाची गोष्ट म्हणजे ते आजही मराठा धर्म मानतात.

    काही समाज हरयाणा कुरुक्षेत्र परिसरात, नर्मदेच्या खोऱ्यात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, गुजरात, अमेरिका, कॅनडा, इत्यादी ठिकाणी राहतो त्या समाजाला ऑनलाईन फार उपयुक्त आहे.
  11. तरीही आम्हाला हि माहिती आम्ही आमच्या अस्सल खानदानी 96 कुळी मराठा बांधवांना विनामुल्य देऊ शकत नाही, याची आम्हाला खंत आहे.

  12. फोनवर माहिती देण्याचे नियम
  13. फोनवरून कोणतीही माहिती मिळवण्यासाठी वेळ सकाळी 9 ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच देण्यात येईल.
    (टीप: संकटकाळी तात्काळ माहिती देण्यासाठी ५०० रुपये तात्काळ फी वेगळी लागेल.)

  14. फोनवरून माहिती देतांना ती एकदाच दिली जाते तेंव्हा ती महत्वाची माहिती लिहून घेण्यासाठी फोन करण्याआगोदर वही, पेन, किंवा फोनवरून सांगितल्या जाणारी माहिती कोणत्याही प्रकारे नोंद केल्या जाईल याची काळजी आवश्य घ्यावी.
  15. अधिक कोणत्याही माहितीसाठी व तक्रारीसाठी धनंजय महाराज मोरे 9422938199 या नंबरवर किंवा more.dd819@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.

 

✔👇 हे ईतरांना पाठवा 👇