रामायणातले संस्कृती दर्शन भाग २


भाग 2


सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन वाल्मिकी रामायणातले संस्कृती दर्शन पाहु.हि लेखमाला अयोध्याकांडापासुन आरंभ केलेली आहे.
रामचंद्रांना राज्याभिषेक करण्याचे राजा दशरथांच्या मनात आल्यानंतर
नाना नगरवास्तव्यान् पृथक् जानपदानपि ।
समानिनाय मेदिन्यां प्रधानान् पृथिवीपति: ।। 46 ।।
राजा दशरथांनी भिन्न भिन्न नगरात राहणार्या प्रधान मंडऴींना, जेष्ठ व सन्माननीय मंडऴीना, अन्य राज्यातल्या राजांना, मंत्र्यांना, नगरप्रमुखांना अयोध्येत बोलवुन घेतले.
(या गडबडित केकय राजा व जनक राजांना चर्चेचे निमंत्रण देणे राहुन गेले होते)
तत: परिषदं सर्वमामन्त्र्य वसुधाधिप:।
हितमुध्दर्षणं चैव मुवाच प्रथितं वच:।। (द्वितीय सर्ग श्लोक 1)
त्या परिषदेत बसलेल्या सर्व मंडऴींना संबोधताना राजा दशरथ म्हणतात.
या श्लोकांचा व आपल्या संस्कृतीदर्शनाचा काय संबध असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.
सांप्रत लोकशाहि व्यवस्था जगभरात अनेक राष्ट्रांत चालु आहे.
पूर्वीच्या काऴी राजेशाहि व्यवस्था होती परंतु राजा म्हणेल तेच योग्य व तीच बाजू पूर्व असा अट्टाहास नव्हता.
राजा देखील अन्य राजांशी, प्रधानांशी, जेष्ठ मंडऴी, पुरोहित, ऋषिमुनी, नगरप्रमुख व मंत्रीमंडऴाशी चर्चा करुनच निर्णय घेत असे.
मनुस्मृतित राज्यप्रबंध असा विषय विस्ताराने आहे त्यात मंत्री कसे निवडावे याचे काहि निकष दिलेत
मौलाञ्छास्त्र्त्रविद:शूरॉल्लब्धलक्षान्कुलोद्गतान् । सचिवान्सप्त चाष्टौ वा प्रकुर्वीत परीक्षितान् ।। (अ.7 श्लोक 54)
पितामहादि क्रमाने सेवा करणारे, दृष्टादृष्टार्थ शास्त्रार्थ जाणणारे, पराक्रमी, आयुधविद्येत निपुण, शुध्द सात्विक कुलात उत्पन्न झालेले व ज्यांची उत्तम प्रकारे परीक्षा घेतली आहे अशाच सात किंवा आठ जणांना मंत्री बनवावे. असे मंत्रीमंडऴ हवे याला अष्टप्रधान मंडऴ असे लौकिक नाव आहे..छ.शिवरायांनी देखील असे मंडऴ नेमले होते हि नोंद आहे.सहज ओघात विषय आला म्हणुन सांगीतल. यात शिफारस किंवा नातेवाईकास, जावयाला, मेहुण्याला , पुतण्याला, लेकीला, सुनेला पद द्या असा उल्लेख नाहि योग्य कामाकरता योग्य व्यक्ति हिच संकल्पना होती.


दुसर्या श्लोकात परिषद असा शब्द आलाय हा शब्द आपल्या सर्वांचा नित्य परीचयाचा आहे.रामायणात देखील अशा परिषदा आयोजीत केल्या जात होत्या
परिषद (कॉन्फरन्स किंवा मिटिंग) हि ब्रिटिशांनी आपणाला हि दिलेली देणगी नाहि हे लक्षात असणे गरजेचे आहे.
सांप्रत आपण लोकशाहिचे “टुणटुणे “वाजवतो पण अनेक पक्षात मात्र उत्तराधिकार्यांची निवड हि लादली जाते.(यात कागदोपत्री निवडणुक दाखवतात पण मत मात्र ऐकले जात नाहि हेहि सत्यच आहे)
रामायणात मात्र दशरथाने रामचंद्राना “लादले “नसुन सर्वांच्या अनुमतीने हा निर्णय घेतला आहे.
आजहि परिषदांचा हेतु हा निर्णय घेणे हा आहे आजहि हि परिषद संस्कृती चालु आहे. जिल्हा परिषद , लोकसभा राज्यसभा, विधान परिषद हि राजकीय व्यवस्था सुरु आहे.
दशरथांनी पुढे जे वक्तव्य केलेय ते फार महत्वाचे आहे
प्राप्य वर्ष सहस्त्राणि बहून्यांयूषि जीवत:।
जीर्णस्याय शरीरस्य विश्रान्तिमभिरोचये ।।(8)
हजारो वर्षांचे आयुष्य असुन मी या जीर्ण शरीराला विश्राम द्यावा अशी कामना करतोय.
हे फार महत्वाचे आहे योग्य काऴी “थांबणे ” हे महत्वाचे आहे
अेक सुंदर वाक्य आहे
कोणीतरी थांब म्हणण्यापेक्षा “का थांबलात ? “हे विचारणे योग्य असते.
योग्य काऴी योग्य व्यक्तीच्या हातात जवाबदारी देणे व आपण निवृत्त होणे हि संस्कृती अाहे.
एक म्हण आहे कि “बापाच्या चपला मुलाला व्हायला लागल्या कि त्याचाकडे जवाबदारी सोपवावी “


अनूभूतानि चेष्टानि मया वीर सुखान्यपि ।
देवर्षिपितृविप्राणां अनृणोऽस्मि तथाऽऽत्मन:।। (4 सर्ग 14 श्लोक)
हे वीर (पुत्रा) मी सर्व सुखे उपभोगलीत मी देव, ऋषि, पितर व विप्रांच्या ऋणातुन मुक्त आहे.यास्तव तु हे पद स्विकार
प्रत्येक मनुष्य जन्मास येताना 3 ऋणे (कर्ज) घेवुनच जन्मास येतो
देव ऋण – देवतांची सेवा, पूजन, अर्चन, यज्ञयाग करुन यातुन मुक्त होता येते
ऋषिऋण – आपल्या पर्यंत आलेली विद्या शिकून ती पूढच्या पिढिला योग्य प्रकारे सुपुर्द करणे
पितृऋण – पितरांच्या उद्देशाने श्राध्द करणे व धर्म मार्गाने व न्यायमार्गाने सुसंस्कारीत प्रजा निर्माण करणे
या सर्व गोष्टि दशरथ राजाने पूर्ण केल्या असल्याने आता हि धूरा तू सांभाऴावीस असे मला वाटते.
आजहि आपल्या कुटुंब व्यवस्थेत मुलगा मोठा झाला शिकला सवरला कि त्याचा खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी दिली जाते हाती व्यवहार दिला जातो .
हे राजेशाहित होत होते परंतु लोकशाहित मात्र धड चालता येत नाहि, बोलता येत नाहि अशीच मंडऴी “अजुनी यौवनात मी “या आवेशात वावरतात. (चार वेऴा पाचवेऴा मीच आमदार मीच खासदार मीच मंत्री हा अट्टहास का? टप्याटप्याने तरुणांना संधी द्या त्यांना मार्गदर्शन करा त्यांची परीक्षा घ्या व योग्य वेऴी त्यांचा हातात कारभार द्या हे सांगायची वेऴ आहे)
दशरथाने हि संस्कृती जाणली होती पुढिल अनेक राजांनी ती जपली होती आजहि अनेक कुटुंबात हि व्यवस्था सुरु आहे कारण आपली परंपरा हि शाश्वत आहे
तुर्त लेखन मर्यादा
वे.भूषण दिगंबर जोशी वेंगुर्ले

Leave a Reply