सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.
301-17विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ 301 ॥भुंग्यानें कोरलेल्या लांकडावर कदाचित् अक्षरा कृति उठावी अथवा टाळी मारीत असतां त्यांत कावळा सहज सांपडावा, त्याप्रमाणे ह्या तामसदान करणारालां पुण्यक्षेत्रांत पर्वणीचा काळ लाभतो. 1302-17तेथ…
