नागमतीला व्यवस्थीत समजावून त्या समजल्या नाही,त्यामुळे राणा म्हणाले,लक्षात ठेवा,चितोडच्या या मान बिंदूला कुठलाही धक्का लागता कामा नये,राणी पद्मिनींचा अवमान मुळीच सहन केल्या जाणार नाही.त्यांच्यासोबत तुमचे वर्तन स्वच्छ आणि सरळच असायला हवे...राजकुमार पद्मवत आणि राणा रतनसिंहांमधे सुरु झालेली आकर्षक लढत सर्व उपस्थित श्वास रोखून बघू लागले.तलवारी एकमेकांवर आदळू लागल्या.प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजल्या जाऊ लागल्या.एकमेकांवर शब्द आणि शस्राचे आघात होऊ लागले. पद्मिनी... चितोडगडचा मानबिंदू,मानदंड त्यागमूर्ती!पद्मिनी...एक धगधगती शलाका,स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा!महाराणी पद्मिनीत आणि झाशीच्या राणीमधे बरेच साम्य आढळून येते.झाशीच्या राणीने स्री सेना तयार करुन शत्रूशी मुकाबला केला तसेच पद्मिनीनेही स्रीसेना तयार करुन स्रीला स्वावलंनाचे धडे शिकवले.