संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा २१ ते २५

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत निवृत्तीनाथ महाराज अभंग सार्थ गाथा

नाही यासि गोत नाही यासी कुळ अभंग क्र.२१

नाही यासि गोत नाही यासी कुळ । शेखी आचारशीळ कोण म्हणे ॥
बाळरुपे हरि गोकुळी लोणी चोरी । त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥
सोवळा हरि वागवी शिदोरी । तो गोपालांच्या करी काला देतु ॥
निवृत्ति संपुर्ण काला देतु जाण । ब्रह्मसनातन गोकुळीचे ॥

अर्थ: एको हं ह्या वेदवाक्यानुसार हे परमतत्व एकटे आहे त्यामुळे त्यास कुळ व नाती नाहीत. तो अकर्तुम असल्याने तो कर्म करतो असे कसे म्हणता येईल. हा परमात्मा गोकुळात एकीकडे लोणी चोरत असताना दुसरीकडे पान्हा अनावर झाल्यामुळे यशोदा त्यास स्तनपानासाठी बोलवत असे. पण सत्वगुणी सोज्वळ शिदोरी ही हा परमात्मा बाळगतो व त्यातील काला गोपाळांच्या हाती खायला देतो. निवृत्तीनाथ म्हणतात गोकुळीच्या ह्या ब्रह्मसनातनाने आपला स्वस्वरुप काला गोपाळांना वाटला.

गोपाळ सवंगडे आले वाडेकोडे अभंग क्र.२२

गोपाळ सवंगडे आले वाडेकोडे । असंख्य बागडे हरिरुपी ॥
बिंबली पंढरी हरिरुप सार । अवघाची श्रृंगार विठ्ठलराजु ॥
कालया कौशल्य नामदेव जाणे । तेथीलीहे खुणे निवृतिराजु ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नरहरि वेगा झेलिताती ॥
वैकुंठ सावळे माजी भक्त मेळे । काला एक्या काळे करिताती ॥
निवृत्ति संरुर्णता घेऊनी उध्दारु । सेविता उदार हरिराणा ॥

अर्थ: श्रीकृष्ण अवतारामुळे त्याचे भक्त त्याच्या प्रेमामुळे गोपवेष घेऊन त्याच्या भोवती अवतरले आहेत. सगळे अलंकार लेऊन हाच परमात्मा पंढरीत विठ्ठल स्वरुपात अवतिरण झाला आहे व पंढरी त्याच्या सार रुपात रंगली. ह्याच्या प्रेमभक्तीने रंगलेले नामदेव, निवृत्तिनाथ त्याची खुण ओळखतात. ह्याने उधळलेला एकात्म काला ज्ञानदेव, सोपान जममित्र नागा, नरहरी सोनारांदी संत वरच्यावर झेलतात. मध्याहच्या वेळेवर एकाच वेळी एका ठिकाणी हा एकात्म काला सावळा रंग घेतलेले परब्रह्म भक्तांच्या मेळ्यात वाटत असते. निवृतिनाथ म्हणतात आम्ही केलेल्या नामरुप प्रेमभक्ती मुळे तो परमात्मा संतुष्ट झाला व त्यांने कृपा करुन माझा संपुर्ण उध्दार केला.

आनंद सर्वांचा काला अरुवार अभंग क्र.२३

आनंद सर्वांचा काला अरुवार । नामया साचार फुंदतसे ॥
राहिरखुमाई सत्यभामा माता । आलिया त्वरिता काल्यामाजी ॥
उचलिला नामा प्रेमाचे फुंदन । नुघडी तो नयन काही केल्या ॥
बुझावित राहि रखुमादेवी बाही । पितांबर साई करी हरी ॥
ज्ञानासी कवळु सोपानासी वरु । खेचरा अरुवार कवळु देतु ॥
निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा । नामयासि सीमा भीमातीरी ॥

अर्थ: काल्यातील सर्वांच्या आनंदाने गहिवरलेले नामदेवराय आनंदाने स्पुंदु लागला. ह्या काल्यासाठी राही रखुमाई व सत्यभामा ही त्वरित आल्या. सर्वांनी अनिवार आनंदात रमलेल्या नामदेवाना उचलुन घेतले तरी आनंदविभोर झालेले नामदेव डोळे उघडायला तयार नव्हते.नामदेवांचे भाग्य पहा दोन्ही मातांनी त्याचे हात धरुन त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला व देवांने त्याच्यावर पितांबराची छाया धरली.ज्ञानदेवांना व सोपानाला देव काल्याचा ब्रह्मैक्याचा घास दिला व विसोबा खेचराना गहिवरुन घास दिला.निवृत्तिनाथ म्हणतात भक्तांनी पूर्ण चंद्रासारखा परिपूर्ण काला अनुभवला व नामदेवांचे वास्तव्य असलेले भीमातीरी आनंदाला सीमा नव्हती.

तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला अभंग क्र.२४

तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला । मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥
चांगयाचे मुखी घालित कवळु । आपण गोपाळु दयासिंधु ॥
दिधले तें तुं घेई पूर्ण तें होई । सप्रेमाचे डोही संतजन ॥
नामया विठ्या नारया लाधले । गोणाई फावले अघटित ॥
राहि रखुमाई कुरवंडी करिता । जींवे वोवाळिता नामयासी ॥
निवृत्ति खेचर ज्ञानदेव हरि । सोपान झडकरी बोलविले ॥

अर्थ: काल्याच्या आनंदात देहभान हरपलेला परमात्मा भक्तांच्या स्वाधिन झाला व त्यांने मुक्ताईला प्रेमाने काल्याचा घास भरवला. तो दयासागर गोपाळ चांगयाच्या तोंडात काल्याचा घास घालत आहे. भगवंत प्रेमाने म्हणाला की पूर्णत्वाचा काला घेऊन तुम्ही संत पूर्णतेला पोहचाल. व हे ऐकुन संत आनंदाच्या डोहात डुंबु लागले. नामदेव त्यांचे चिंरजीव विठ्ठल, नारायण आई गोणाई ह्यांना ही काल्याच्या आनंदात भाग घेता आला. प्रेमाने राहि रखुमाईनी प्रेमाने नामदेवांना औक्षण केले. निवृत्तिनाथ म्हणतात की देवांने मला, ज्ञानदेव, सोपान, व विसोबा खेचरांना आवर्जुन प्रेमाने त्वरित बोलावुन घेऊन त्यांना काल्याचा लाभ दिला.

नुघडुनिया दृष्टी नामा पाहे पोटी अभंग क्र.२५

नुघडुनिया दृष्टी नामा पाहे पोटी । आनंदाची सृष्टी तया जाली ॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी । तुजमाजी निवासी हरि आहे ॥
नामा पसरी मुख आनंदाला तृप्त । कवळु पूर्णभरित हरिराज ॥
निवृत्तिने सेविला कवळु हा हरि । तुं च चराचरी दिससी आम्हा ॥

आनंदात न्हालेले नामदेव डोळे उघडत नाहीत पण अंतर्मुख होऊन पाहतात तेंव्हा सर्व अर्थ: सृष्टी त्यांना आनंदाची भासते. निवृत्तिनाथ नामदेवांना भानावर आणुन काल्याचा घास घेण्यास सांगतात. हा एकात्म काला घेऊन तुझ्यात निवास करत असलेल्या परमात्माचे दर्शन घेण्यास सुचवतात. त्या आनंदात नामदेव आपले मुख पसरतात व देव त्यांना काल्याचा घास भरवतो.निवृत्तिनाथ म्हणतात देवांने त्या काल्याचा घास मला दिल्यावर ब्रह्मैक्य चराचराचे दर्शन मला एकत्वाने झाले.

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

संत
वारकरी संत
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
निवृत्तीनाथ महाराज सार्थ अभंग गाथा
सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा
ज्ञानेश्वर महाराज सार्थ अभंग गाथा
संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा
ई-संपादक
धनंजय विश्वासराव मोरे
(B.A./D.J./D.I.T.)
आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५
मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading