ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.411

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४११

सहस्रदळ साजिरें नयनाचे शेजारीं । अर्धमातृका अंतरीं चिन्मय वस्तु ॥१॥ ॐ कार नादी की नाद ॐ कारीं । दैवी निरंतर प्रणवीं पहा ॥२॥ मकार अर्धमात्रा शून्यांचा निश्चय । आत्मा एक असे स्वयें रया ॥३॥ ज्ञानदेव म्हणे कैवल्याचा दाता । कोण पत्रीं हे कविता नाहीं ऐसी ॥४॥

अर्थ:-

प्रत्येक जीवाच्या डोळ्याच्या वरच्या बाजूत म्हणजे मस्ताकांत सुंदर असे सहस्रदळ कमळ आहे. त्यातील अर्धमात्रिकेच्या आंत ती तेजोमय ब्रह्मवस्तु आहे. शमदमादि दैवी संपत्तीचा आश्रय करुन नेहेमी प्रणवाचे ध्यान करा. म्हणजे ओंकाराच्या ठिकाणी नाद धर्म आहे. की नादाच्या ठिकाणी ओंकार आहे हे कळेल. ओंकारातील अकार, उकार, मकार, अर्धमात्रा व अनुस्वार ही सर्वच आत्मरुप आहेत. हा नाद बिंदु मोक्ष देणारा आहे असे कोणत्या वेदांत ग्रंथात नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading