👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४१०
सत्रावीचे गांवी शून्याचा विस्तार । प्रणव निराकार सदैव असे ॥१॥ पश्चिमपूर्व असे शुक्ल कृष्ण नारी । दैवी आणि आसुरी वेगें शोधा ॥२॥ ज्ञानदेव म्हणे अर्थमात्रा कोणती । मसुरामात्र आहे ती दोन्ही भाव ॥३॥
अर्थ:-
सतराव्या जीवन कलेच्या स्थानीच शून्याचा विस्तार दिसतो. तोच प्रणवाचे निराकार असे रुप आहे. या स्थानावरुन पश्चिमेस व पूर्वेस असे दोन मार्ग दैवी आसुरी संपत्तीचे फुटतात, यांना शुक्ल व कृष्ण असेही म्हणतात. मसुरी प्रमाणे असणारी अर्धमात्राच ब्रह्मरुप आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.