नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९३०
आशाबद्ध आम्ही भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥
प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥
आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥
तुका म्हणे एक झालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
अर्थ
देवा आमचा जीव आशाबध्द आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला करुणा भाकीत आहोत. आमचा जीव तुमचे कार्य करण्यासाठी तत्पर आहे. देवा आम्ही तुमच्या महाव्दारामध्ये उभा राहून तुमच्या नामाचा जयघोष करत आहोत व तुमच्या प्रत्युत्तराची वाट पाहात आहोत. हे माझ्या स्वामी तुम्ही आपल्या योग्यतेप्रमाणे मला करुन ठेवा आणि माझा संसारसंबंध तोडून टाका. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा अहो एकदा की आपण दोघेही एकमेकाच्या कार्याविषयी तत्पर झालो की मग व्यर्थ बडबडच कोण करील ?”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
