नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९३१
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥
आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥
खाणार ताकाचें असे त मांजर । आपणचि अधीर कळों येतें ॥२॥
तुका म्हणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥
अर्थ
काजव्याने सूर्याकडे ढुंगण करुन त्याचा प्रकाश प्रकाशीत केला तर सूर्य आणि काजवा या दोघांमधे जास्त प्रकाश कोणाचा आहे याविषयी सर्व जगच साक्षी राहाणार आहे. आपला मोठेपणा आपण राखविणे हे योग्य नाही परंतू काही मूर्ख लोक असे आहेत की जे आपला मोठेपणा सर्व जगभर मिरवत फिरत असतात. ताक सेवन करणारा मांजरा असतो त्याच्या त्या कर्मानुसारच तो किती अधीर आहे हे कळून येते. तुकाराम महाराज म्हणतात, “मैंद लोकांचे बोलणे म्हणजे लबाड लोकांचे बोलणे कितीही गोड असो परंतू त्याचा काहीही उपयोग नाही त्यांच्या बोलण्याला आग लागो त्यांचे बोलणे म्हणजे बकऱ्यांना जसा लोभ दाखवून त्यांना जवळ घेऊन खाटीक त्याची मान सुखाने कापतो तसे मैंद लोकांचे बोलणे घातक असते.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
