नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९१२
सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांठविलें ॥१॥
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप ।
करा एक खेप । मग नलगे हिडणें ॥ध्रु.॥
विभव गुंडोनी पसारा । धांव घाला पंढरपुरा ॥२॥
आयुष्य वेंचे जंव आहे । तोंची धांवोनिया जाये ॥३॥
आळस न करीं या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
अर्थ
निजस्वरूप रूप जे सुख आहे ते पंढरीला आले आहे पुंडलीकाने ते पंढरीमध्ये साठवून ठेवलेले आहे.हे माझे बाप हो तुम्ही जिभेच्या द्वारे नामाचे खरे माप घेऊन नाम घ्यावे नाम घ्यावे.अहो त्यां नीजस्वरूपी सुखाची तुम्ही एकच वेळ खेप करा त्यामुळे तुम्हाला जन्ममरणाची येरझार करत अनेक योनीमध्ये हिंडत बसावे लागणार नाही.सर्व प्रकारच्या भोगाचा पसारा गुंडाळून तुम्ही पंढरपूर कडे धाव घ्यावी.जोपर्यंत आयुष्य नामक खर्ची तुमच्याकडे आहे तोपर्यंतच तुम्ही पंढरीला धावत जावे.तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या सुखाचा लाभ करून घेण्याकरता तुम्ही आळस करू नका, मी कुणब्याचा तुका तुम्हाला अशी विनंती करत आहे.
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
