नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र.२९०८
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥
राहातेति तुम्ही भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषयची ॥ध्रु.॥
कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥
तुका म्हणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायाशीं हेचि करीं ॥३॥
अर्थ
मी मनाला फार विरोध करतो परंतू काम क्रोधादी विकार काही केल्या मोडलेच जात नाही आणि विषय ज्या माध्यमातून घुसतात ते इंद्रियरुपी व्दार अडवणेही फारच कठीण आहे. देवा तुम्ही जर माझ्या अंत:करणात भरुन असतात तर मी निर्विषय होऊन तदाकार झालो असतो. देवा तुमच्या कृपेचा जर अनुभव माझ्याकडे असता तर मी काहीही बोलणे हे योग्य ठरले असते परंतू तुमच्या कृपेचा अनुभवच माझ्याजवळ नाही आणि नुसतेच कोरडे बोलून ते काही उपयोगाचे ठरणार आहे काय तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, “देवा कोणताही व्यापार जर केला तर त्याचा ताळमेळ बसवावा लागतोच नाही तर तो व्यापार देखील सफल ठरत नाही त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या व आमच्या मनाचा ताळमेळ बसवा हीच मी विनंती तुमच्या पायाजवळ बोलतो आहे.”
नंबर प्रमाणे सूची <-:-> आद्याक्षर सूची
वारकरी रोजनिशी
वारकरी अभंग भजनी मालिका
धनंजय महाराज मोरे
सार्थ तुकाराम गाथा
संत तुकाराम अभंग गाथा
तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा
तुकाराम गाथा सार्थ
तुकाराम महाराज गाथा सार्थ
सार्थ गाथा.
WARKARI ROJNISHI
http://www.warkarirojnishi.in/
https://96kulimaratha.com/
DHANANJAY MAHARAJ MORE
96 kuli maratha
SARTHA TUKARAM GATHA
SANT TUKARAM ABHANG SARTHA GATHA
SARTHA ABHANG GATHA
TUKARAM MAHARAJ SARTHA GATHA
ABHANG SARTHA GATHA
SANT TUKARAM SARTHA GATHA
TUKARAM GATHA
SARTHA GATHA
